Breaking News

ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावरील आदरणीय खा शरद पवार साहेबांची भूमिका अन्यायकारकशिवसंग्रामप्रणित महाराष्ट्र ऊसतोड कामगार, मुकादम, वाहतूकदार संघटचे अध्यक्ष बबनराव माने यांची प्रतिक्रिया

बीड  : राज्यात ऊसतोड मजूर, मुकादम आणि वाहतूकदार यांना दीडशे टक्के वाढीव भाव मिळावा म्हणून अनेक दिवसांपासून शिवसंग्रामप्रणित महाराष्ट्र ऊसतोड कामगार, मुकादम संघटना व इतर ऊसतोड मजूर संघटनांनी संप पुकारला होता. शिवसंग्राम संस्थापक अध्यक्ष आ विनायकराव मेटे यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेकडून विविध ठिकाणी मेळावे, बैठका, कामगारांना समुपदेशन करण्यात आले होते. या संपाबाबत तोडगा काढण्यासाठी काल देशाचे आदरणीय नेते खा शरद पवार साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत बोलावण्यात आलेल्या बैठकीत जो निर्णय झाला तो ऊसतोड कामगार, मुकादम, वाहतूकदारांवर अन्यायकारक ठरणारा आहे. हि बैठक कारखानदारांच्याच प्रतिनिधींची होती असे अध्यक्ष बबनराव माने यांनी म्हंटले.
    अपेक्षित  दरवाढ न देता तूटपुंजी दरवाढ देऊन पवार साहेबांनी ऊसतोड कामगारांच्या अपेक्षांवर पाणी फिरवण्याचे काम केले आहे. आम्ही ज्यांना जाणते म्हणतो त्यांनी अजाणतेपणाने हा घेतलेला निर्णय ऊसतोड कामगारांमध्ये निराशा पसरवणारा ठरलेला आहे असे शिवसंग्रामप्रणित महाराष्ट्र ऊसतोड कामगार, मुकादम, वाहतूकदार संघटचे अध्यक्ष बबनराव माने यांनी म्हंटले आहे. १४ टक्क्यांची दरवाढ हि अतिशय कमी आहे, यासोबतच ऊसतोड कामगारांच्या भवितव्यासाठी केलेल्या मागण्या, सुरक्षितता, आरोग्य, विमा आदी बाबतीत अपेक्षित निर्णय घेतले नसल्याचे त्यांनी यावेळी म्हंटले. यावेळी संघटनेचे गुरसाळी महाराज, बेलदार मुकादम, नामदेव गायकवाड, राठोड, गणेश खांडेकर, विश्वास पाटील, शशिकांत दातार, गणेश चव्हाण, दादा गोंदावले आदींसह पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.


No comments