Breaking News

अखेर नराधमाला पोलिसांनी केलं गजाआड
पळवून नेवून अल्पवयीन मुलीवर केला होता अत्याचार : 

गौतम बचुटे । केज 

युसुफ वडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अल्पवयीन मुलीस पळवून नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली. याप्रकरणी गुन्हा नोंद झाल्यानंतर आरोपीचा पोलीस शोध घेत होते. मात्र पोलिसांना गुंगारा देत नराधम फरार झाला होता. तब्बल वर्षभरानंतर त्याला गजाआड करण्यात  युसूफ वडगाव पोलिसांना  यश मिळाले. 

मिळालेल्या माहितीनुसार केज तालुक्यातील युसुफ वडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत दि. २७ मार्च २०१९ रोजी विकास गोविंद चाटे (रा. कौडगाव ता. केज) याने एका अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेले. त्या अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने वारंवार बलात्कार केला. त्यानंतर त्याने दि. १२ ऑक्टोबर २०२० रोजी त्या अल्पवयीन मुलीस परत आणून सोडले. या प्रकरणी युसूफ वडगाव पोलीस ठाण्यात आरोपी विकास गोविंद चाटे याच्या विरुद्ध गु.र.नं. २१२/२०२० भा.दं.वि. ३७६, ३६३, ३६६, ३४ आणि बाल लैंगिक अत्याचार अधिनियम २०१२ चे कलम ४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. 

तब्बल वर्षभरापासून नराधम विकास चाटेचा पोलिस शोध घेत होते. मात्र तो पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर शुक्रवारी (दि.१६) युसूफ वडगाव पोलीसांनी आरोपी विकास गोविंद चाटेला ताब्यात घेतले. याप्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद झोटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय आटोळे करीत आहेत. 

सपोनि विजय आटोळेNo comments