Breaking News

मोमीनपुऱ्याच्या पुलासाठी आमदार मेटे यांचे उपमुख्यमंत्री अजितदादांना पत्र


बीड :
शहरातील  खासबाग देवी ते मोमीनपूरा भागाला जोडण्यासाठी बिंदूसुरा नदीवर पक्क्या पुलाची आवश्यकता आहे. बीड शहराच्या मध्यवर्ती भागातून वाहणाऱ्या बिंदूसुरा नदीवरील बार्शी नाका पूल आ विनायक मेटे यांच्या प्रयत्नांतून झाला होता. त्याप्रमाणेच मोमीनपुरा - खासबागला जोडणारा पुलदेखील आ विनायक मेटे हेच करू शकतात अशी भावना येथील स्थानिक लोकांनी व्यक्त केली आहे. मोठ्या संख्येने या ठिकाणी स्थानिक लोकांनी जमत हि मागणी आ विनायक मेटे यांच्याकडे केली होती. यावेळी आ विनायक मेटे यांनी या ठिकाणची पाहणी करत आपण यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितल्यानंतर तात्काळ उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्राद्वारे या पुलाची मागणी केलेली आहे.
 
  मोमीनपुरा, इस्लामपुरा आदी भागातून नागरिकांना खासबागकडे येण्यासाठी बार्शी नाका किंवा सुभाष रोडच्या पुलाचा वापर करावा लागतो. यामुळे याचे अंतर अधिकचे पडते. मात्र मोमीनपुरा भागात जर पूल करण्यात आला तर या भागातील स्थानिक लोकांच्या सोयीचे होऊ शकते. हा प्रश्न क्षीरसागर कुटुंबीय नव्हे ते आ विनायक मेटेच मार्गी लावू शकतात अशी भावना येथील स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली होती. यावेळी या भागातील नागरिकांनी आ विनायक मेटे यांना निवेदन देखील दिले. यानंतर तात्काळ दखल घेत उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे पत्राद्वारे पुलाची मागणी केलेली आहे. मागणी केल्याबद्दल शिवसंग्राम अल्पसंख्यांक शहराध्यक्ष जाकेर हुसेन, शहर उपाध्यक्ष शेषेराव तांबे, इकबाल रेहमान, नादेर कुरेशी, मोहसीन कुरेशी, अझहर भाई, सलमान अली, समीर सरकार, शकील खान व या भागातील स्थानिक लोकांनी आभार मानले आहेत. 


No comments