Breaking News

आ. धस यांनी दिली वाशिमच्या पोहरादेवी मंदिरासाठी एक लक्ष रुपये देणगी

                                                    

के. के. निकाळजे । आष्टी   


 

वाशिम जिल्ह्यातील बंजारा समाजाचे आराध्य दैवत असलेल्या पोहरादेवी,सेवालाल महाराज,रामराव महाराज यांच्या समाधीचे तसेच भक्तीस्थळाचे दर्शन आ. सुरेश धस यांनी घेतले तसेच या पोहरादेवीच्या सुरु असलेल्या अद्यावत मंदिर बांधकाम उभारणीस देणगी म्हणून १ लक्ष १ हजार रुपये दिले तर सेवालाल महाराज आणि रामराव महाराजांच्या समाधीस्थळी दर्शन घेऊन २१ हजार रुपयांची देणगी  दिली. 

  

याबाबत  की. महाराष्ट्र ऊसतोड मजुर,मुकादम,वाहतूकदार यांच्या प्रश्नांवरती सुरु असलेल्या राज्याच्या दौऱ्या दरम्यान वाशिम जिल्ह्यातील बंजारा समाजाचे आराध्य दैवत असलेल्या पोहरादेवी,सेवालाल महाराज,रामराव महाराज यांच्या समाधीचे तसेच भक्तीस्थळाचे दर्शन आ.सुरेश धस यांनी घेतले तसेच या पोहरादेवीच्या सुरु असलेल्या अद्यावत मंदिर बांधकाम उभारणीस देणगी म्हणून १ लक्ष १ हजार रुपये दिले तर सेवालाल महाराज आणि रामराव महाराजांच्या समाधीस्थळी दर्शन घेऊन २१ हजार रुपयांची देणगी देत आपली भक्ती अधिक वृद्धींगत व्हावी अशी मनोमनी इच्छा व्यक्त केली.यावेळी तेथील असणाऱ्या पुजा-यांनी आणि ट्रस्टच्या पदाधिका-यांनी आ.सुरेश अण्णा धस यांचे आभार मानले.

विशेष म्हणजे अण्णांच्या या दातृत्ववान कार्याला शुभेच्छा म्हणून अण्णांना उदंड आयुष्य आणि आरोग्य लाभो यासाठी महाराजांनी आशिर्वाद देत पोहरादेवी, सेवालाल महाराज, रामराव महाराज यांच्या समाधीस्थळी सामुहिक प्रार्थना देखील केली. याप्रसंगी स्थानिकचे आ. निलय नाईक, आ. राजेंद्र पाटणे, भक्तीधाम ट्रष्टचे अध्यक्ष जितेंद्र महाराज, संस्थानचे अध्यक्ष कबीरदास महाराज, बाबूसिंग महाराज आदी उपस्थीत होते.


No comments