Breaking News

कोरोना रुग्णांमध्ये हॅप्पी हायपाॅक्सिया घातक -डाॅ रमेश भराटेगौतम बचुटे । केज  

सध्या सर्वत्र कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. सर्दी, ताप, डोके दुखी,घसा खवखवणे, दम लागणे ही लक्षणे दिसताच त्वरित तपासणी करुन घेण्यात येते; परंतु सर्वच रुग्णांमध्ये अशी लक्षणे दिसुन येत नाहीत. काही रुग्ण हे लक्षणे विरहीत असतात व अशा रुग्णांना दम पण लागत नाही. परंतु शरीरातील ॲाक्सिजन ९०% पेक्षा कमी झालेले असते. असे रुग्ण हे हॅप्पी हायपाॅक्सिया स्टेज मध्ये असतात. असे प्रतिपादन प्रसिद्ध श्वसन विकार व गायत्री हाॅस्पीटलचे संचालक डाॅ. रमेश भराटे यांनी नमुद केले. 

कोरोना रुग्णांमध्ये माईल्ड, मॉडरेट व सिवेअर अशा तीन स्टेज असतात. पहिल्या दोन स्टेज मध्ये वेळीच निदान व ऊपचार केल्यास रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाण कमी होते. परंतु बऱ्याच वेळा आजार गंभीर न समजणे व घरच्या घरी पल्स ॲाक्सिमिटरवर खेळत बसणे धोकादायक ठरते. जेव्हा रुग्णांची ॲाक्सिजन लेवल ८०%-९०% दरम्यान असते. तेव्हा पण काही रुग्णाना लक्षणे जाणवत नाहीत. हिच वेळ जास्त धोकादायक असते. या स्टेजला हॅप्पी हायपाॅक्सिया असे म्हणतात. अद्याप पण व्हॅक्सीन किंवा निश्चित अशी ऊपचार प्रणाली उपलब्ध नसल्यामुळे ह्रदयरोग, रक्तदाब, मधुमेह, कर्करोग, कॅन्सर, किडनी विकार, दमा व श्वसन विकार असणाऱ्या रुग्णांमध्ये ईतर रुग्णांच्या तुलनेत मृत्यूचे प्रमाण अधिक आढळून आलेले आहे. असे डाॅ. रमेश भराटे यांनी सांगितले.


No comments