Breaking News

केज तालुक्यात वीजेचे तांडव : एकाचा मृत्यू तर दुसरा जखमी

गौतम बचुटे । केज   तालुक्यातील हादगाव (डोका) आणि उमरी येथे परतीच्या पावसात प्रचंड गडगडाटासह वीज पडून झालेल्या दोन वेेेगवेगळ्या नैसर्गिक अपघातात एका ३० वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू तर दुसर्‍या घटनेेेत एका ४० वर्षीय शेतकरी गंभीर जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार हादगाव (डोका) ता. केज येथील झुंबरलाल उर्फ केशव शिवाजी हंगे वय ३० वर्ष हे सायंकाळी ५:०० च्या दरम्यान काढणी करून ठेवलेले सोयाबीन झाकून घरी येत असताना गावाजवळील नदी जवळ हदगाव-भोपला रस्त्या जवळ विजेच्या गडगडाट आणि लखलखटासह पाऊस सुरु झाला. त्यात झुंबरलाल उर्फ केशव हंगे यांच्या अंगावर वीज कोसळली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच दुसऱ्या घटनेत उमरी येथेही सायंकाळी ५:३० वा. सुमारास संतोष मेघराज भैरट वय ४० वर्ष हे शेतात औताने पाळी घालण्याचे काम करीत असताना यांच्या अंगावर वीज पडली. या अपघातात संतोष भैरट हा गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ  ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय येथे हलविण्यात आले असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली आहे. दरम्यान हादगाव डोका येथील घटनेची केज पोलीस स्टेशनला आकस्मिक मृत्यची नोंद घेण्यात आली असल्याची माहिती पोलीस नाईक अमोल गायकवाड यांनी दिली आहे.

मयत झुंबरलाल उर्फ केशव हंगे

No comments