Breaking News

पंकजाताईंच्या जीवावर मोठे झालेल्या स्वयंघोषित नेत्यांनी अकलेचे दिवे पाजळू नये-इंदूबाई गोल्हार


भारत पान संबळ । शिरुर

लोकनेते गोपीनाथराव मुंडे आणि त्यांच्या वारसा असलेल्या पंकजा मुंडे यांच्या जीवावर मोठे झालेल्या तालुक्यातील स्वयंघोषित नेत्याने पंकजा मुंडेचा जन्म बंगल्यात झाल्यामुळे त्यांना ऊसतोड मजुरांच्या प्रश्नांचे ज्ञान नसल्याची गरळ ओकत आपल्या अकलेचे दिवे पाजाळले असल्याचे भाजपच्या ज्येष्ठ नेत्या इंदूबाई गोल्हार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

ज्या स्वयंघोषित नेत्याला कधीही पदापासून दूर ठेवले नाही त्या नेत्याला पंकजाताईंच्या आशीर्वादाने पंचायत समिती सदस्य,चार वेळा जि.प.सदस्य आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक पद मिळाले तो नेता आज बंड करणाऱ्या नेत्याच्या दावणीला राहून पंकजा मुंडे यांच्या विरोधात बरळत आहे.पंकजाताई मुंडे यांचा राजकीय अनुभव मोठा असताना देखील त्यांच्या विषयी अशा प्रकारे भाष्य करणे म्हणजे स्वताच स्वताच्या अकलेचे दिवाळे काढले असल्याचा आरोप देखील पत्रकात करण्यात आला आहे. 

चाळीस वर्षे मुकादमकी करून आणि राजकीय सत्तापटलावर बसून जनतेच्या हिताच्या दृष्टीने महत्वाची कामे न करता स्वताची घरं भरण्याचे काम   ज्यांनी केले आहे त्यांना पंकजाताईं बद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार नाही.या पुढे ताईंबद्दल उचलली जीभ लावली टाळ्याला असा प्रकार करू नये.संत भगवान बाबा आणि संत वामनभाऊ यांनी या स्वयंघोषित नेत्याला सद्बुद्धी द्यावी अशी प्रार्थना देखील इंदूबाई गोल्हार यांनी केली आहे.
No comments