मराठा आरक्षणासाठी संभाजी सेनेचे वडवणी तहसील समोर निदर्शने
जगदीश गोरे । वडवणी
सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला दिलेली स्थगिती जो पर्यंत उठत नाही तोपर्यंत शासनाने कोणतीही शासकीय नोकर भरती करु नये यासाठी वडवणी तालुका संभाजीसेनेच्या वतीने तहसील कार्यालयासमोर निदर्शने करून तहसीलदार सांगळे यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी संभाजी सेनेचे मराठावाडाध्याक्ष कृष्णाजी देशमुख,बीड जिल्हाध्याक्ष भरतर वालेकर, ग्रामीण जिल्हाध्याक्ष श्रीराम नाईकवाडे, वडवणी तालुकाध्याक्ष श्रीराम शिंदे, धारूर तालुकाध्याक्ष अविनाश अंडील, बाळासाहेब भंडारी, गोविंद रूद्रे, प्रदिप अंडील, सुरेश अंडील, कृष्णा गायकवाड आदी संभाजी सेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments