Breaking News

कारखानदारांनी संप फोडण्याचा प्रयत्न करु नये अन्यथा उग्र आंदोलन करणार - मोहन जाधव

ऊसतोड कामगारांना चोरट्या मार्गाने घेऊन जाणाऱ्या अनेक गाड्या सीटूने परत पाठविल्याबीड :  ऊसतोडणी कामगारांना तोडणीदर ४०० रुपये करा, वाहतूक दर, मुकादमाच्या कमिशनमध्ये वाढ करावी. कल्याणकारी महामंडळ स्थापन करा, दरवाढीचा करार तीन वर्षाचा करावा या मागणी साठी सीटू ऊसतोडणी कामगार संघटनेसह इतर संघटनेच्या वतीने संप पुकारण्यात आलेला आहे, परंतु काही कारखानदार आणि मुकादम रात्री चोरट्या मार्गाने ऊसतोड कामगारांना घेऊन जात आहेत, या कामगारांच्या गाड्या ऊसतोड कामगार नेते मोहन जाधव हे विनंती करून वापस पाठवत आहेत. आणि जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तो पर्यंत कारखानदार व काही मुकादमांनी संप फोडण्याचा प्रयत्न करू नये नसतात उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा मोहन जाधव यांनी दिला आहे. 

शासन जो पर्यंत मागण्या मान्य करत नाही तो पर्यंत संप मागे घेण्यात येणार नाही. ऊसतोडणी कामगारांना तोडणीदर ४०० रुपये करुन, वाहतूक दर व मुकादमाच्या कमिशनमध्ये वाढ करावी. कल्याणकारी महामंडळ स्थापन करावे, मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न, स्थलांतरीत कामगार कायद्यानुसार कामगारांची नोंदणी करण्यात यावी, कोरोनाच्या काळामध्ये ऊसतोडणी कामगारांना वेगळा विमा लागू करण्यात यावा या मागण्या सीटू ऊसतोड कामगार संघटनेने केलेल्या आहेत, या आंदोलनात मोहन जाधव सह आबा राठोड, विनायक चव्हाण, विजय राठोड, अनिल राठोड, साहेबराव जाधव, बंडु राठोड, सुहास जायभाये, दत्ता प्रभाळे, संतोष जाधव, रामराव राठोड, शिवाजी जाधव, बाळू राठोड, दत्ता सौंदरमल, बाबुराव राठोड, रोहिदास जाधव, विनायक राठोड, गणेश राठोड, सुरेश राठोड, सुनिल जाधव, माणिक पवार, संजय चव्हाण, मोहन पवार, रवी राठोड, रोहिदास पवार, राहुल राठोड, संजय राठोड, बाळु पवार, जगन्नाथ जाधव, ज्ञानेशवर पवार, राजू राठोड, दत्ता राठोड, विष्णू पवार, सुखदेव पवार, मनोहर राठोड, विलास राठोड, शरद पवार, सतिश पवार, रमेश राठोड आदी आहेत.
No comments