Breaking News

वैद्यनाथ नगरीत राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्यांचे भव्य मंदीर निर्माणासाठी जागा व चौक निर्माण करण्याची पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्याकडे मागणी- चेतन सौंदळे


परळी :  ज्योतीर्लिंग क्षेत्र प्रभू वैद्यनाथ नगरीत वसुंधरारत्न राष्ट्रसंत प.पू.डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज,अहमदपुरकरांचे भव्य मंदीर निर्माण करण्यासाठी जागा व त्यांच्या नांवे श्री.वैजनाथ मंदीर परीसरात चौक निर्माण करण्याची मागणी नगरसेवक तथा 82 व्या श्रावणमास तपोनुष्ठान समितीचे अध्यक्ष चेतन सौंदळे यांच्यासह पदाधिकारी व लिंगायत समाज बांधवांच्यावतीने महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री तथा बीड जिल्हयाचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.21व्या शतकातील महान तपस्वी राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज, अहमदपुरकर [अप्पा] दि.1 सप्टें 2020 रोजी शिवैक्य झाले. स्वातंत्र्यपूर्व काळात पाकिस्तानातील लाहोर विद्यापीठातून एम. बी. बी. एस. शिक्षण झालेले असताना ब्रिटीशांविरूध्द लढा देवून भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महाराजांनी तुरूंगवासही भोगला होता.

संपूर्ण मानवासाठी समाजाभिमुख, लोक कल्याणकारी कार्यासोबत त्यांची शिकवण सर्वांना सदैव प्रेरणादायी आणि जगण्याची ऊर्जा देणारी आहे. तसेच त्यांचे सामाजिक एैक्यासाठीचे कार्य वयाच्या 105 व्या वर्षी शेवटच्या श्वासापर्यंत चालूच होते.  


स्वागतोत्सुक या नात्याने पालकमंत्री ना.धनंजय मुंडे व माजी ग्रामविकासमंत्री पंकजाताई मुंडे यांच्या जबाबदारीतून श्री.वैजनाथ मंदीर परीसरात डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराजांचे 21 दिवसाचे अद्वितीय भव्य-दिव्य व नेत्रदिपक 82 वा  श्रावणमास तपोनुष्ठान सोहळा सर्व समाज बांधव व श्री.वैजनाथ देवस्थान ट्रस्टच्या योगदानातून लोक कल्याणकारी, समाजाभिमुख, अभूतपूर्व, अविस्मरणीय व एैतिहासिक असा संपन्न झाला.

अशा महान तपस्वीच्या भव्य मंदीर निर्माण करण्यासाठी जागा व श्री. वैजनाथ मंदीर परीसरात चौक निर्माण करण्याची मागणी नगरसेवक चेतन सौंदळे,अनिल अष्टेकर, तपोनुष्ठान समितीचे कार्यअध्यक्ष शाहुराव ढोबळे, उपाध्यक्ष चंद्रकांत उदगीरकर, वैजनाथ बागवाले,गिरीष बेंबळगे,सचिव संतोष पंचाक्षरी,पदाधिकारी सोमनाथ निलंगे, रमेशअप्पा सपाटे, दयानंद चौधरी, मकरंद नरवणे, नागेश हालगे, अशोक नावंदे, नंदू्अप्पा खानापुरे, सोमनाथ गोपनपाळे, अॅड.मनजीत सुगरे, कैलास रिकीबे, सुशील बुद्रे, चंदूअप्पा हालगे, प्रा. अमर आलदे, उमाकांत काळे, शिरीष सलगरे, सदानंद चौधरी, शिवशंकर नाईक, अतुल खके, दीपक कापसे, जगदीश मिटकर, रवी मिसाळ, शशी बिराजदार, स्वप्निल वेरूळे,प्रकाश खोत,गजानन हालगे, बाबासाहेब शिगे, रमेश चौधरी सर, बालाजी चीडबुके, चंद्रकांत अंदुरे, नागेश अलबिदे, उल्हास ओपळे, वैजनाथ निलंगे,अनिल मिसाळ,संदीप चौधरी, नंदकिशोर शेटे, जगदीश पोपडे, आदेश हलकंचे, रत्नेश बेलुरे, आर. जी. स्वामी, अनिल चौधरी, मन्मथ नरवणे, वैजनाथ वेरूळे, अमोल घेवारे, शिवदीप चौंडे, निरंजन गौरशेट्टे, उमेश बुरांडे, उमाकांत पोपडे, श्रीकांत खोत आदि समाज बांधवांनी केली आहे.


No comments