Breaking News

श्री साई संत भगवानबाबा प्रतिष्ठानचा दुर्गोत्सव यावर्षी नाही- फुलचंद कराड


परळी : 
परळी शहरातील नागरिक विशेषत: देवी भक्तांमध्ये लौकिक असलेला श्री साई संत भगवानबाबा प्रतिष्ठान अंतर्गत होणारा दुर्गोत्सव 2020 यावर्षी कोरोना विषाणूचा वाढत चाललेला प्रादुर्भाव व शासनाने घालून दिलेल्या निर्देशानुसार होणार नसल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष फुलचंद कराड यानी एका पत्रकाद्वारे दिली.

नवरात्रोत्सवास आज 17 ऑक्टोबर पासून प्रारंभ होत असून दरवर्षी होणारा श्री साई संत  भगवानबाबा प्रतिष्ठानचा सार्वजनिक दुर्गोत्सव यावर्षी होणार नसल्याची माहिती फुलचंद कराड यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे. मागील दहा वर्षापासून सातत्याने परळी शहरात दुर्गोत्सवाच्या अंतर्गत किर्तन, देवी भागवत तसेच करमणूकीचे कार्यक्रम आदींच्या माध्यमातून सातत्याने समाज प्रबोधनाचे काम आम्ही केले होते. यावर्षी देशभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने केंद्र व राज्य सरकारने सार्वजनिक कार्यक्रमावर निर्बंध घातले आहेत. या पार्श्वभूमीवर परळी शहरात होणारा दुर्गोत्सव यावर्षी होणार नसल्याचे खंत फुलचंद कराड यांनी व्यक्त केली. दरम्यान कराड यांच्या कार्यालयात श्री देवी मुर्तीची स्थापना करण्यात येणार असून दररोज सकाळ संध्याकाळ विधीवत पूजा आणि आरती करण्यात येणार आहे.यावर्षी विजयादशमीचा पुतळा दहन कार्यक्रम सुद्धा होणार नसल्याचे त्यांनी संागितले.


No comments