पंकजाताई मुंडे यांची भाजपाच्या राष्ट्रीय सचिवपदी निवडीबद्दल धनराज गुट्टे यांच्या कडून सत्कार
परळी वैजनाथ : भारतीय जनता पाक्षाच्या राष्ट्रीय सचिव आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांची भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत सचिव म्हणून नियुक्त झाल्यानंतर परळी येथे भाजपाचे भटक्या विमुक्त आघाडीचे विदर्भ प्रभारी धनराज गुट्टे यांच्या वतीने शाल व श्रीफळ, फेटाबांधून हृदय सत्कार करण्यात आला.
शहरातील यशश्रीः निवासस्थानी भारतीय जनता पाक्षाच्या राष्ट्रीय सचिव आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांची भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत सचिव म्हणून नियुक्त झाल्यानंतर आज प्रथमच त्यांचे जिल्ह्यात तसेच परळी वैद्यनाथ येथे आगमन झाले होते. त्यानिमित्ताने अखिल भारतीय वंजारी युवा संघटनेचे अध्यक्ष, रेल्वे बोर्ड दिल्ली चे सदस्य,भाजप भटक्या विमुक्त आघाडीचे विदर्भ प्रदेश प्रभारी धनराज विक्रम गुट्टे यांच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला. पंकजाताई मुंडे यांच्या सत्कार प्रसंगी विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली आहे. यावेळी अखिल भारतीय वंजारी युवा संघटनेचे व भाजप भटक्या विमुक्त आघाडीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
No comments