Breaking News

एआयएमआयएमने अमृत अटल आणि भुयारी गटार योजनेचे होत असलेले चुकीचे काम योग्य पद्धतीने करण्यास पाडले भाग


बीड : 
शहरातील मोहम्मदिया कॉलनी मध्ये असलेले प्रभाग क्रमांक 19, 20, 21 मध्ये करण्यात येत असलेले अमृत अटल योजना तसेच भुयारी गटार योजनेचे काम चुकीच्या पद्धतीने करण्यात येत असल्याने एआयएमआयएम चे युवा नेते सय्यद इलयास यांनी या बाबीकडे लक्ष देऊन ते योग्य पद्धतीने करण्यास भाग पाडले. 

याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहरामध्ये अनेक भागात सध्या केंद्र शासनाच्या अमृता अटल योजनेसह भुयारी गटार योजनेचे कार्यही कमीअधिक प्रमाणात सुरू आहे. या दोन्ही योजनेचे काम मोहम्मदिया कॉलनीमध्ये सुद्धा सुरू असून ते मात्र चुकीच्या पद्धतीने करण्यात येत होते. मोहम्मदिया कॉलनी ज्या भागात वसलेली आहे तेथील संपूर्ण जमीन चढ-उताराची असून जमिनी चे आकारमान पाहून त्यानुसार भूगर्भात करण्यात येणारे कोणतेही कार्य करणे आवश्यक असते. मात्र या बाबीकडे सध्या होत असलेल्या या दोन्ही योजनेचे काम जमिनीला डोळ्यासमोर ठेवून होत नसल्याने याकडे एआयएमआयएम चे युवानेते नेते सय्यद इलयास यांनी लक्ष देऊन जमिनीच्या आकारमानाप्रमाणे संबंधित अभियंत्यांना व कर्मचाऱ्यांना ही बाब लक्षात आणून देत योग्यप्रकारे काम करण्यास लावले. चढ-उतार असलेल्या येथील जमिनीवर अमृत अटल योजना आणि भुयारी गटार योजनेचे काम वरून सुरू करून खालपर्यंत आणणे क्रमप्राप्त आहे. परंतु ते खालून सुरू करून वर पर्यंत घेऊन जात होते. 

यामुळे या दोन्ही योजनेचे कार्य व्हावे तसे झाले नसते. पुढे चालून या दोन्ही योजनेत बिघाड आला असता. हे लक्षात येताच सय्यद इलयास यांनी संबंधित अभियंता व कर्मचाऱ्यांना याबाबत समजावून सांगत चालू असलेले कार्य खालून वर ऐवजी वरून खाली करण्यास सांगितले. व पुन्हा येथे या योजनेचे कार्य सुरू करण्यात आले. त्यांच्या दक्षतेमुळे संबंधित कार्य करणारे अभियंता, कर्मचाऱ्यांचा मोहम्मदिया कॉलनीच्या नागरिकांनी इलयास यांचे आभार व्यक्त केले. सध्या येथे भुयारी गटार योजनेचे कार्य युद्धपातळीवर सुरू असून हे कार्य संपताच अमृत अटल योजनेचे काम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती नागरिकांना देण्यात आली आहे. अशी माहिती एआयएमआयएम चे युवा नेते सय्यद इलयास यांनी दिली आहे.No comments