Breaking News

जनसामान्यांच्या निरोगी आरोग्यासाठी माझे कुटुंब- माझी जबाबदारी मोहिम गावापतीळीवर राबविणार- ॲड. चव्हाण, बांगर


बीड : माझे कुटुंब- माझी जबाबदारी मोहिमेमुळे महाराष्ट्राचा हेल्थ मॅप तयार करण्यास मदत होणार असून त्याद्वारे सुदृढ आणि निरोगी महाराष्ट्राचे निर्माण करणे शक्य होणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. या मोहिमेची राज्यभर अंमलबजावणी सुरु झाली असून बीड शहरासह जिल्ह्यातील प्रत्येक खेड्यात ही ही योजना पोहचून निरोगी आरोग्य ठेवण्यात मदत होणार आहे तरी या या मोहिमेत आपली स्वतःची जीमेदारी म्हणून सहभागी व्हा असे आव्हान  शिवसेना जिल्हा प्रमुख ऍड संगीत चव्हाण आणि चंद्रकला बांगर यांनी केले आहे.

कोरोनाला रोखण्यासाठी सोशल डिस्टंसिंगचं पालन होणं आवश्यक आहे. सरकारकडून आवाहन केलं जातं आहे. मात्र तरी गर्दी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. करोना विरुद्धच्या नव्या मोहिमेत सर्वांचा सहभाग गरजेचा आहे. महाराष्ट्र शासन माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या संकल्पनेतुन आणि शिवसेना नेते चंद्रकांत खैरे मराठवाडा समन्वयक विश्वनाथ नेरूरकर, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलमताई गोरे, मंत्री जयदत्त क्षीरसागर, बीड संपर्कप्रमुख आनंदजी जाधव, महिला संपर्क संपदा गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली व बीड नगराध्यक्ष भारत भूषण जी शिरसागर दोन्ही जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांच्या सहकार्याने शिवसेना महिला जिल्हाप्रमुख ॲड. संगीता चव्हाण व चंद्रकला बांगर यांच्या नेतृत्वाखाली बीड व शहर ग्रामीणमध्ये प्रत्येक घरातून प्रत्येक कुटुंबातील सदस्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना पुढील उपचार मिळण्यासाठी नगरसेवक शुभम धूत, शुभम हातागळे, फरजना शेख, शामल पवार, सारिका काळे, रेखा वाघमारे, संगीता वाघमारे, शारदा डुलगुज सह  शिवसेना महिला ही योजना राबविण्याचे प्रयत्न करत आहेत. तरी सर्वानी आपली स्वतःच्या आरोग्याची काळजी म्हणून या मोहिमेला सहकार्य करावे.


No comments