Breaking News

उत्कृष्ट प्रयोग शाळा वैद्यानिक म्हणून आष्टी रुग्णालयातील जयचंद नेलवाडे यांचा राज्यपालांच्या हस्ते होणार सन्मान

महाराष्ट्रातील पंचवीस वैद्यकीय सेवा देणा-या कोविड योध्दांचा होणार सन्मान 


आष्टी : कोरोनाच्या काळात आरोग्य विभागात उकष्ठ कार्य करणा-या महाराष्ट्रातून औंरगाबाद, कोकण, आमरावती, नाशिक, नागपूर व पुणे या सहा विभागातून वैद्यकीय अधिकारी, अधिपरिचारीका, प्रयोगशाळा वैद्यानिक अधिकारी, कक्ष सेवक व आशासेविका यांना राज्यपालांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार असून,तर मराठवाड्यातून उकृृृृष्ठ प्रयोगशाळा वैद्याकीय अधिकारी आष्टी ग्रामिण रुग्णालयांचे जयचंद नेलवाडे यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

            

 कोरोना काळात भयान परिस्थितीत आपल्या जिवाची व परिवारांची पर्वा न करता कार्यात कसलास कसूर न करता कर्तव्य पार पाडणा-यांची दखल राज्याचे राज्यपालांनी घेतली असून महाराष्ट्रातील कोकण, औरंगाबाद, नागपूर, नाशिक व पुणे या सहा विभातून वैद्यकीय अधिकारी, अधिपरिचारीका, प्रयोगशाळा वैद्यानिक अधिकारी,कक्ष सेवक व आशासेविकांना गुरूवार दि.15 आॅक्टोंबर रोजी सांयकाळी 5 वा मुंबई राजभवन येथे सन्मानित करण्यात येणार आहे. तर मराठवाड्यातून उकृृृृष्ठ प्रयोगशाळा वैद्यानिक अधिकारी म्हणून आष्टी ग्रामिण रुग्णालयातील जयचंद शिवमुर्ती नेलवाडे यांना सन्मानित करण्यात येणार आहे. त्यांचे आष्टी ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डाॅ.राहूल टेकाडे, वैद्यकीय अधिकारी डाॅ. रामदास मोराळे, डाॅ. बालाजी गुट्टे, डाॅ. किशोर भोसले, प्रयोगशाळा वैद्यानिक अधिकारी मोहन गलांडे, डाॅ. अमित डोके, नागेश करांडे, डाॅ. संतोष जावळे यांच्यासह ग्रामिण रुग्णालयातील अधिपरिचारीका, कर्मचारी वद व सर्वै कोविड टिमने त्यांचे अभिनंदन केले आहे.
No comments