Breaking News

पिकअप- ट्रकची समोरासमोर धडक ; दोघे गंभीर

जामखेड- नगर राज्य महामार्गावरील पडलेल्या खड्डयांमुळेचं घडतायेत अपघाताच्या घटना

 


शेख कासम । कडा  

अहमदनगर - जामखेड - बीड राज्यमार्गावरील साबलखेड (ता.आष्टी) येथे शुक्रवारी (ता.२३) मध्यरात्री १२.३०ते १ वाजण्याच्या  सुमारास पिकअप व ट्रक यांच्यात समोरासमोर धडक झाली यामध्ये दोन जण गंभीर जखमी तर अन्य दोघे किरकोळ जखमी झाले आहेत. अपघात घडल्यानंतर ट्रक चालक व त्यांच्या सोबत असणार्‍या सहकारी यांनी पिकअपमधील जखमी यांना कॅबिनमध्ये अडकलेल्या जखमीना सुखरुप बाहेर काढले व अंभोरा पोलीसांना झालेल्या घटनेची माहीती दिली तो पर्यंत साबलखेड येथील नागरिकांनी अपघातग्रस्तांना मदत केली. 

अंभोरा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन जखमीना जवळच्या दवाखान्यामध्ये उपचार्थी दाखल केले.  विकास तागड हे पिकअप (एम एच १६ सी सी २२२६) घेऊन  जामखेड येथुन अहमदनगर येथे जात होते तर मोहम्मद दस्तगीर सय्यद हे ट्रक (एपी-१३ एक्स ६७२५) घेऊन वापी (गुजरात) येथून हैद्राबाद येथे जात होते.  सदरील दोन्ही वाहने साबलखेड (ता.आष्टी) येथे शुक्रवारी मध्यरात्री १२.३० वा. सुमारास आल्यानंतर समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. या अपघातामध्ये पिकअपचे चालक विकास तागड व प्रशांत मांडगे हे गंभीर जखमी झाले तर ट्रकचालक मोहम्मद दस्तगीर सय्यद व अन्य एक किरकोळ जखमी झाले आहेत.


No comments