Breaking News

प्रा.नारायण पाळवदे यांना पितृशोकपरळी : तालुक्यातील जेष्ठ राजकिय सामाजीक व्यक्ती हेळंब सेवा सोसायटीचे माजी व्हाईस चेअरमन माणिकराव पाळवदे यांचे (92) आज दि.27 रोजी पहाटे चार वाजता निधन झाले. मंगळवारी दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.  प्रा.नारायण पाळवदे, प्रा.डॉ.नागोराव पाळवदे, हेळंबचे उपसरपंच राम पाळवदे यांचे ते वडील होते.

          

  परळी तालुक्यातील हेळंब येथील रहिवासी माणिकराव जगन्नाथ पाळवदे हे हेळंब व परिसरात अभ्यासू व्यक्तीमत्व म्हणुन ओळखले जायचे झाले.संयमी वैभवशाली व मनाने श्रीमंत असलेला जनमाणसातला सर्वसामान्यांच्या कामाला धाऊन जाणारे व्यक्तीमत्व, गावातील प्रतिष्ठीत व्यक्ती,  गावच्या विकासात, ग्रामस्थांच्या सुख दुःखात सहभागी होवुन हेळंब गावचा विकास साधला. उपसरपंच, सेवा सोसायटीचे व्हाईस चेअरमन व अनेक वर्षे संचालक म्हणुन काम करताना असंख्य शेतकर्यांच्या समस्या सोडवल्या वयाच्या 92 व्या वर्षी आज मंगळवार दि.27 ऑक्टोबर रोजी पहाटे चार वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. वैद्यनाथ महाविद्यालयातील प्रा.नारायण पाळवदे, प्रा.डॉ.नागोराव पाळवदे, हेळंबचे उपसरपंच राम पाळवदे यांचे ते वडील होते. परळी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष महादेव गित्ते, लाडझरीचे हरिहार चाटे यांचे ते आजोबा होते.

       स्व.माणिकराव जगन्नाथ पाळवदे यांच्या पार्थिवावर आज दुपारी हेळंब येथील शेतात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नातेवाईक, गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  स्व. माणिकराव पाळवदे यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, दो मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा भरगच्च परिवार आहे. पाळवदे परिवाराच्या दुःखात दृष्टीकोन न्यूज परिवार सहभागी आहे. 


राख सावडण्याचा कार्यक्रम 

      दरम्यान स्व. माणिकराव जगन्नाथ पाळवदे यांचा राख सावडण्याचा कार्यक्रम गुरुवार दि.29 आँक्टोंबर रोजी  सकाळी ७ होणार असल्याचे कुटुंबींयांनी सांगितले.

No comments