'जिंकायचे आहे युद्ध' ने मारली बाजी !
भारत पानसंबळ । शिरूरकासार
युनिसेफ आंतरराष्ट्रीय संघटना आणि शारदा कृषि वाहिनी बारामती (९०.८ एफ.एम.) यांच्या वतीने आयोजित केलेल्या काव्यस्पर्धेत साहित्यिक विठ्ठल जाधव यांच्या 'जिंकायचे आहे युद्ध' या कवितेने अव्वल क्रमांक पटकावला.
शारदा कृषि वाहिनी बारामती (पुणे) आणि युनिसेफच्या यांच्या वतीने काव्यस्पर्धेसाठी महाराष्ट्रातून विविध स्तरातून स्पर्धक सहभागी झाले होते. ही स्पर्धा 'लढा कोरोनाशी' या विषयावरील कवितांसाठी होती. शिरूर येथील प्रसिद्ध साहित्यिक विठ्ठल जाधव यांच्या ' जिंकायचे आहे युद्ध ' या कवितेने अव्वल स्थान पटकावले.
जिंकायचे आहे युद्ध
आता घरात राहून
शत्रू सामोरा आहे
येतो अदृश्य होऊन
या समर्पक ओळीत कोरोना महामारीचे विश्लेषण केले आहे.
मास्क, सॅनिटायझरचा वापर, वयस्क आणि बालकांची काळजी तसेच योग्य शारीरिक अंतर या अनुषंगाने कवितेची रचना विठ्ठल जाधव यांनी केली होती. जाधव यांनी कोरोनाच्या संदर्भाने शतकी कविता लेखन केले असून पुस्तक रूपात वाचकांसमोर येत आहेत.
No comments