हजरत शहेंशाहवली बाबा उर्स कार्यक्रम रद्द
-कोरोनाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी उर्स कमिटीने घेतला निर्णय
बीड : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सरकार व प्रशासनाने धार्मिक उत्सव आयोजित करण्यात मनाई हुकुम असल्यामुळे यंदा 20 आक्टोबर रोजी होणारा शहेंशाहवली दर्गाह उर्स रद्द करण्यात आला आहे. दरम्यान उर्स व कव्वाली आदि सर्वच कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. याची भाविक भक्तांनी नोंद घ्यावी असे आवाहन दर्गाह मुजावर सय्यद कबीर अलाउद्दीन व शेख नईमोद्दीन मोईनोद्दीन यांनी केले आहे.
हजरत कोचकशाहवली अबुल फैज रह. उर्फ हजरत शहेंशाहवली बाबा यांचा उर्स दर वर्षी साजरा करण्यात येतो. यंदा कोरोना देश व राज्यात कोरोना महामारीची साथ सुरू आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी राज्य सरकार व जिलाधिकारी यांच्या आदेशाचे पालन करीत यंदा उर्स कमिटीने दर्गाह उर्स रद्द केला आहे. हिंदू- मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेल्या शहेंशाहवली बाबा दर्गाह उर्स निमित्ताने बीड, मराठवाडयासह राज्यभरातील भाविक भक्त बाबांच्या दरबारी हाजरी हाजरी लावत असतात. संदल व उर्स निमित्त दर्गाह परिसर चार दिवस गजबजलेला असतो. दरम्यान जवळपास 50 हजार भाविक बाबांचे दर्शन घेतात. परंतु सवासहाशे वर्षांपासूनची अखंडीत सुरू असलेली ही परंपरा पहिल्यांदा खंडीत होत आहे.
संदल व उर्स सर्वच कार्यक्रम रद्द करण्यात आली आहे. याची राज्यभरातील भाविक भक्तांनी याची नोंद घ्यावी. असे हजरत शहेंशाहवली दर्गाह उर्स रद्द आवाहन दर्गाह मुजावर यांनी संयुक्तरित्या प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात केले आहे.
No comments