भवानीनगर दुर्गोत्सव मंडळाचे सामाजिक कार्य कौतुकास्पद- विनोद सामत
परळी : शहरातील भवानीनगर दुर्गोत्सव मंडळ मागील अनेक वर्षापासून सातत्याने गणेशोत्सव, दुर्गोत्सव साजरा करीत असून उपक्रमासोबतच होणारे सार्वजनिक कार्यक्रम कौतुकास्पद आहेत असे मत वैद्यनाथ बॅंकेचे उपाध्यक्ष विनोद सामत यांनी व्यक्त केले.
भवानीनगर दुर्गोत्सव मंडळ येथे आज शुक्रवारी वैद्यनाथ बॅंकेचे उपाध्यक्ष विनोद सामत यांच्या हस्ते देवीची विधीवत पुजा व आरती करण्यात आली. प्रारंभी विनोद सामत यांचा भोजराज पालीवाल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नवरात्र उत्सव कालावधीत कोरोना विषाणूचा वाढलेला संसर्ग लक्षात घेवून दुर्गोत्सव मंडळाने आयोजित केलेल्या उपक्रमांचे विनोद सामत यांनी कौतुक केले. ते म्हणाले की, कोरोना जनजागृतीबाबत दुर्गोत्सव मंडळाने जनजागृती करण्यासोबत नागरिकांना कोरोना पासून बचाव कसा करावा याची माहिती दिली. हे सर्व उपक्रम आदर्शवत्त असल्याचे ते म्हणाले.
यावेळी भवानीनगर दुर्गोत्सव मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा शिवसेनेचे माजी शहरप्रमुख भोजराज पालीवाल यांच्यासह विविध व्यापारी महासंघाचे अध्यक्ष माऊली फड,नारायणराव सातपुते, शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख जगन्नाथ साळुंके, जेष्ठ नेते रविंद्र परदेशी, बद्रीनारायण बाहेती, गजराज पालीवाल, संदीप चौधरी, हरिष पालीवाल, विजय जाधव, पिंपळ, प्रकाश साळुंके, होळकर यांच्यासह भाविक भक्तांची उपस्थिती होती.
No comments