Breaking News

पिकांच्या नुकसान भरपाईच्या मागणीसाठी शेतकरी बचतगटही सरसावले......!


परतीच्या पावसाने झालेल्या नुकसान भरपाई द्या

कृषिधन शेतकरी विकास बचत गटाची तहसीलदारांकडे मागणी


गौतम बचुटे ।  केज  

परतीच्या पावसाने केज तालुक्यात झालेल्या पिकाचे पंचनामे करून हेक्टरी ५० हजार रु अनुदान देण्याची मागणी केज तालुक्यातील आवसगाव येथील शेतकरी बचत गटाने तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली. 

या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील आवसगाव येथील शेतकरी बचत गटाच्या वतीने दि.१६ ऑक्टोबर रोजी तहसीलदारांना एक निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, परतीच्या पावसाने केज तालुक्यात  शेतकऱ्यांच्या पिकांचे खूप मोठे नुकसान झालेलं आहे. त्यामुळें नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना त्याची नुकसान भरपाई व पीक विमा मिळण्यासाठी कार्यवाही करावी. निवेदनांवर सिद्धेश्वर घुले, विठ्ठल बस्तापुरे, सचिन साखरे आणि सतीश लांब यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


No comments