Breaking News

नाहीतर उसाच्या फडातून कामगार बाहेर आणू, पंकजा मुंडेंचा इशारा



पाटोदा : कुणीतरी म्हटले होते, की उसतोड कामगारांचे निर्णय मुंबईत बसून होत नाही. उसतोड कामगारांचे निर्णय धाब्यावर बसून होतात का? उसतोड कामगारांचे निर्णय घेण्यासाठी फडातच जावं लागत असं नाही. पंकजा मुंडेंच्या विरोधात स्टेटमेंट केले की हेडलाईन होते. मुंडे साहेब साखर कारखानदार होते, ते पण ऊसतोड कामगारांचे नेतृत्व करायचे. लवाद नको असे कोण मागणी करतेय. शरद पवारांनी आता पुढची बोली करावी. ऊसतोड कामगार स्वाभिमानी आहेत. 27 तारखेच्या बैठकीत जो निर्णय होईल ते जाहीर करा नाहीतर ऊसाच्या फडातून कामगार बाहेर आणू, असा इशारा भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी दिला आहे. 

सावरगाव घाट येथे भगवान भक्ती गडावर पंकजाताई मुंडे यांचा दसरा मेळावा ऑनलाईन पद्धतीने झाला. यावेळी त्या बोलत होत्या. पंकजाताई म्हणाल्या की, मी निवडणुकीत पराभूत झाले माझ्या पेक्षा कार्यकर्ते जास्त खचले. रस्त्यावर कसे उतरायचे हे आम्हाला चांगले माहीत आहे. ऊसतोड कामगारांचा मेळावा हा एका राजकीय पक्षाचा कसा काय? असं म्हणत त्यांनी प्रकाश आंबेडकरांवर टीका केली.  त्या म्हणाल्या की, उद्धव ठाकरेंनी 10 हजार कोटींचं पॅकेज घोषित केलं. मी त्यांचं स्वागत करते. मात्र शेतकऱ्यांचं अश्रू पुसण्यासाठी हे पॅकेज पुरेसं नाही. शेतकऱ्यांचे अत्यंत हाल झाले आहेत. शेतकऱ्यांसाठी योग्य निर्णय घ्यावा अन्यथा विरोधी पक्षांना रस्त्यावर उतरावं लागेल.

पंकजाताई आता घरा बाहेर येणार नाहीत अशा चर्चा करत होते. मला येण्यासाठी कोरोनामुळं परवानगी मिळाली नाही. मुंडेसाहेबांचं दर्शन मी ऑनलाईन घेतलं. मात्र भगवान बाबांच्या दर्शनाशिवाय दसरा मेळावा होऊच शकत नाही. तुम्ही आलातच मी ही रिस्क घेतली. मीही मास्क काढून टाकला. मी शेतकऱ्यांच्या बांधावर गेले. कुणी फुलांनी स्वागत केलं, कुणी अश्रुंनी स्वागत केलं.  माझ्या दारा समोरची गर्दी कधी कमी होऊ देऊ नको अशी मागणी देवा जवळ केली असल्याचे त्या म्हणाल्या.

महाराष्ट्रभर दौरा काढणार

पंकजा मुंडे म्हणाल्या की, मी निवडणुकीत हरले. माझ्यापेक्षा पराभूत माझे कार्यकर्ते वाटते. मी म्हटलं काय तुम्ही मनावर घेतलंय. साहेब आपल्यातून गेले यापेक्षा मोठी घटना आहे का ही. 'जिंदगी की रेस में जो लोग आपको दौडकर हरा नहीं सकते. वो आपको तोडकर हराने में लगते है.' मी या रेसमध्ये जीव तुटेपर्यंत पळत राहील, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. आपल्या पाच वर्षातील कामांची उद्घाटनं अजून होत आहेत, असं त्या म्हणाल्या. मी महाराष्ट्रभर दौरा काढणार आहे, ज्याच्या डोळ्यात अश्रू आहेत त्या माणसा सोबत पंकजा मुंडेला आणि त्यांच्या कार्यकर्त्याला पोहोचावे लागणार आहे, असंही त्या म्हणाल्या. गोपीनाथ मुंडेंचं स्वप्न होतं त्याप्रमाणं शिवाजी पार्क वर ही हा मेळावा आपण घेऊ.  असं सांगताना पंकजा मुंडेंना अश्रू अनावर झाले होते. 

  



No comments