Breaking News

ऊसतोड कामगारांना चोरट्या मार्गाने कारखान्याला कारखानदारांनी घेऊन जाऊ नये अन्यथा आंदोलन तीव्र करणार - मोहन जाधव


सीटू ऊसतोडणी कामगार संघटनेच्या शाखा उद्घाटन प्रसंगी केले आवाहन

माजलगाव : ऊसतोडणी कामगारांना तोडणीदर 400 रुपये करा, वाहतूक दर व मुकादमाच्या कमिशनमध्ये वाढ करावी. कल्याणकारी महामंडळ स्थापन करावे आणि दरवाढीचा करार तीन वर्षाचा करावा अशी मागणी सीटू ऊसतोडणी कामगार संघटनेच्या वतीने मोहन जाधव आणि अशोक (आबा) राठोड यांनी केली आहे.

शासन जो पर्यंत मागण्या मान्य करत नाही तो पर्यंत कामगार कारखान्यावर जाणार नाही, ऊसतोडणी कामगारांना मागील पाच वर्षातल्या अंतरिम वाढीसह तोडणीदर 400 रुपये करुन वाहतूक दर व मुकादमाच्या कमिशनमध्ये वाढ करावी. कल्याणकारी महामंडळ स्थापन करावे. उसतोड कामगारांच्या विम्याचा प्रश्न, मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न, दरवाढीचा करार दर तीन वर्षानीच करण्यात यावा. स्थलांतरीत कामगार कायद्यानुसार कामगारांची नोंदणी करण्यात यावी अन्यथा एकही  उसतोडणी कामगार कारखाण्यावर जाणार नाही. कोरोनाच्या काळामध्ये ऊसतोडणी कामगारांना वेगळा विमा लागू करण्यात यावा अशा मागण्या सीटू ऊसतोड कामगार संघटनेने मांडल्या.
या शाखा उदघाटन कार्यक्रमास सिटू ऊसतोडणी कामगार संघटनेचे नेते मोहन जाधव व आबा राठोड प्रमुख मार्गदर्शक तर विनायक चव्हाण, विजय राठोड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी शाखा अध्यक्षपदी सुरेश राठोड, शाखा सचिवपदी राहुल राठोड, कोषाध्यक्षपदी सुनील राठोड तसेच उपाध्यक्ष म्हणून बाळू राठोड, अमोल जाधव, सहसचिव म्हणून नितीन राठोड, वैजनाथ राठोड, मार्गदर्शक म्हणून बाबुराव राठोड, विनायक राठोड, चेअरमन रोहिदास जाधव यांची निवड करण्यात आली. यासोबतच सदस्य म्हणून भारत राठोड, गोपीनाथ राठोड, शिवाजी जाधव, सुनील जाधव, विकास राठोड, दत्ता राठोड, युवराज राठोड, लहू राठोड, सुरेश जाधव, शिवाजी राठोड यांची निवड झाली। त्याबद्दल त्यांचे उपस्थितांनी लाल रुमाल गळ्यात टाकून स्वागत केले.


No comments