Breaking News

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे कार्य युवकांसाठी प्रेरणादायी - ओमप्रकाश बुरांडे

 


परळी येथे कामगार कल्याण केंद्रात डाॅ. कलामांना अभिवादन

परळी  :  डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे कार्य प्रत्येक तरुणांना प्रेरणा देणारे आहे.  रामेश्वरम मधील एका छोट्या गावापासून ते राष्ट्रपतिपदापर्यंत झालेला डॉ. कलाम यांचा विलक्षण प्रवास युवकांसाठी प्रेरणादायी  असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार ओमप्रकाश बुरांडे यांनी केले.

 

येथील कामगार कल्याण केंद्रात  भारतरत्न माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त गुरूवारी  त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले.  यावेळी ज्येष्ठ  पत्रकार ओमप्रकाश बुरांडे बोलत होते.  पत्रकार जगदीश शिंदे, केंद्र संचालक आरेफ शेख यांची उपस्थिती होती. 

युवकांनी पुस्तक हेच आपले वैभव आहे, हे  डाॅ. कलाम यांचे विचार आत्मसात करण्याचे आवाहन  ओमप्रकाश बुरांडे यांनी केले. उज्वला बडवे, सोनम गव्हाणे,  मसरत  खान, तुलसी कमलू, काजल भोसले यांच्यासह विद्यार्थी,  कर्मचारी उपस्थित होते. 

 No comments