Breaking News

शेतकऱ्याच्या खात्यामध्ये हेक्टरी ५० हजाराची मदत जमा करा; संभाजी ब्रिगेडचे तहसील समोर उपोषण !माजलगांव :  येथील तहसिलदार यांच्यामार्फत संभाजी ब्रिगेडच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन करण्यात आले असून अतिवृष्टीमुळे शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाल्या मुळे सरकारने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हेक्टरी ५०,००० रुपये टाकावे या व इतर मागण्यासाठी काल दि २० ऑक्टोबर रोजी संभाजी ब्रिगेडच्या वतीने उपोषण सुरू केले आहे.

  

बीड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात गेल्या काही दिवसात अतिवृष्टीमुळे शेकऱ्यांच्या सर्व पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. महोदय मागील दोन – चार वर्षापासून पावसाचे पर्जन्यमान कमी असल्याने पिकांचे उत्पादन घटले आहे व बोगस बियाण्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी त्रस्त होता. त्यातच मागील सात महिन्यापासून कोरोनाच्या प्रभावामुळे शेतमालाला बाजार भाव मिळाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे हाल झाले या हंगामामध्ये पिके चांगली आली होती. परंतु अतिवृष्टीमुळे सर्व पिकांचे नुकसान झाले असल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडून हवालदिल झाला आहे. यामुळे शासनाने पंचनामे न करता सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये मदत म्हणून तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करावी. 

         तसेच पिक विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश पिक विमा कंपन्यांना द्यावेद व शेतकऱ्यांना भरघोस मदत करण्यात यावी. तसेच पिक कर्जापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर कर्ज माफीचा लाभ देण्यात येऊन, त्यांना नवीन पिक कर्ज देण्यात यावे. नवीन पिक कर्ज अर्जदार  शेतकऱ्यांना तात्काळ वाटप करण्यात यावे. माजलगांव, धारूर, वडवणी, गेवराई तालुक्यातील पांदन/शेत रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे. काही ठिकाणच्या पांदन/शेत रस्त्याचे बोगस काम करून बील उचलेल्या गुत्तेदारांवर व बोगस बिल काढून देणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी. आधार कार्ड सेंटर प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर सुरु करावे . तरी वरील मागण्या तात्काळ पूर्ण कराव्यात अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीने बीड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र आंदोलन  करण्यात येईल असा इशारा त्यांनी  दिलेल्या निवेदनातून केला होता त्या अनुषंगाने काल येथील तहसील समोर उपोषण केले. 

 या वेळी विजय दराडे ( जिल्हाध्यक्ष),ऑड पांडुरंग गोंडे ,राहुल सुरवसे ,सचिन भगत ,लक्षीमन  काशीद ,नितीन येवले ,किरण सोळंके ,मोजम कुरेशी , सुग्रीव कुरे कुंडलिक घाडगे ,ज्ञानेश्वर आळणे वआदी उपस्थित होते.


No comments