Breaking News

जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत द्या - एड. शाहरुख पटेल

 


बीड :
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने अतिवृष्टी होत आहे. जास्तीच्या पावसाने कापूस, सोयाबीन, ऊस या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत करावी अशी मागणी एड. शाहरुख पटेल यांनी पत्रकाद्वारे केलीय. 

बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर आस्मानी संकट कोसळल्याने शेतकरी पुन्हा आर्थिक अडचणीत आला आहे. कोरोना महामारी आणि आत्ता अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. शासनाने न्यायाची दखल घेऊन बीड जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून जिल्ह्यातील सरसकट शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी एड. पटेल यांनी केली आहे. No comments