Breaking News

दिवाळीनंतरच शाळा महाविद्यालयाचे दरवाजे उघडणार - किसकींदा पांचाळबीड : विश्वकल्याण महिला सेवाभावी संस्थांच्या अधक्षा तथा/ शिवस्वाराज्य युवा महाराष्ट्र राज्य महिलाआघाडीच्या मराठवाडा अध्यक्षा किसकींदा पांचाळ, 29 ऑक्टोबर गेल्या सात महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे बंद असलेल्या शाळांचे दरवाजे आता पुन्हा एकदा उघडणार आहे. राज्य सरकारने नवीन जीआर प्रसिद्ध केला आहे. 

त्यामुळे शाळा महाविद्यालय मध्ये 50 टक्के शिक्षकांना उपस्थित राहणे बंधनकारक ठरणार आहे. राज्य सरकारने नवीन जीआर जारी केला आहे. शाळा महाविद्यालय शैक्षणिक संस्था मधील ऑनलाइन,ऑफलाइन आणि दुरुस्त क्षणासाठी राज्य सरकारने मान्यता दिली आहे. त्यासाठी 50 टक्के शिक्षकांनी  शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहे. 50 टक्के क्षमतेने उपस्थितीत राहता  येणार आहे. या आधी 14 ऑक्टोबर रोजी राज्य सरकारने अनलॉक ची नवीन नियमावली जाहीर केली होती. यात शिक्षण क्षेत्राबद्दल महत्त्वाचा बदल करण्यात आला होती. 50 टक्के  शिक्षकांना क्षमतेने शाळेत येण्यास परवानगी देण्यात आली होती. परंतु ऑक्‍टोबरपर्यंत शाळा बंद राहणार आहे सरकारचा नवा आदेश राज्यातील शाळा महाविद्यालय शैक्षणिक संस्था दिनांक 31.10. 2020 पर्यंत विद्यार्थ्यांसाठी व नियमित वर्ग घेण्यासाठी बंद राहतील. मात्र ऑनलाइन,ऑफलाईन,शिक्षण, आणि दुरूस्त शिक्षण सुरु करण्यासाठी करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. 

ऑनलाइन/ ऑफलाईन शिक्षण/ दुरुस्त शिक्षण/ Tele -counselling आणि त्यांच्याशी संबंधित कामकाज करण्यासाठी राज्यातील शासकीय, खाजगी, अनुदानित, विना अनुदानित, इत्यादी सर्व प्रकारच्या शिक्षण संस्थामार्फत चालविण्यात येणाऱ्या शाळांमधील 50टक्के शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी ऑनलाइन/ ऑफलाईन/ दुरुस्त शिक्षणाशी सांबांशित कामकाजासाठी तत्काळ कामावर रुजू व्हावे शिक्षण व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आरोग्य, स्वच्छता व इतर सुरक्षाविषयक उपाययोजना बाबत मार्गदर्शन सूचना सोबत जोडलेल्या परिषिष्टामध्ये देण्यात आल्या आहेत.तसेच या विभागाच्या संदर्भ मधील दिनांक 15 जून, 2020 रोजी च्या परिपत्रकातील सूचनेचे पालन करण्यात यावे.

राज्यातील करोणाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचे दिसत आहे तरी शाळा सुरू करण्याचा विचार दिवाळीनंतरच करण्यात येईल, असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांचे आरोग्य व सुरक्षा यालाच राज्य सरकारने प्रधान्य राहील त्यामुळे सध्या तर शाळा सुरू करण्याचा निर्णय योग्य नसल्याचे त्या म्हणाल्या. विविध जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव पाहून टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्याचा विचार करण्यात येणार आहे.नववी ते बारावीचे विद्यार्थी हे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांपेक्षा पेक्षा जास्त सलग असल्याने आणि त्यांचे महत्त्वाचे शैक्षणिक वर्ष असल्याने या वर्गाचा शाळा सुरू करताना प्रामुख्याने विचार केला जाणार असल्याचेही शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले.फी उखळणाऱ्या शाळांची तक्रार करा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ह्या वर्षीची पालकांची आर्थिक परस्थिती बिकट झाली असल्याने त्यांना टप्प्यात भरण्याची मुभाही  देण्यात आलेली आहे. जर विद्यार्थी फी भरू शकला नाही तरी शाळा अशा विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणापासून वंचित ठेवू शकत नाही. शाळा शासनाने विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवले तर अशा शाळांवर कारवाई केली जाईल असा इशाराही शिक्षणमंत्र्यांनी दिला. तसेच अशा शाळा विरोधात स्थानिक शिक्षण अधिकाऱ्याकडे तक्रार करण्याचे आव्हानही त्यांनी पालकांना केले आहे. अकरावीच्या प्रवेशाबाबत लवकरच निर्णय अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया मराठा आंदोलनाच्या न्यायालय प्रक्रियेत अडकले आहे. त्यामुळे कॉलेज सुरू व्हायला वेळ लागत आहे. या संदर्भात लवकरच बैठक घेऊन विद्यार्थ्यांह्यांचा निर्णय घेण्यात येईल,असेही शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.


No comments