Breaking News

आष्टी तालुक्यातील नागरिकांनी कोरोना आजारा बाबत जागृत रहावे - तहसिलदार राजाभाऊ कदम

सर्दी, खोकला व ताप असल्यास न घाबरता कोरोना टेस्ट करण्याचं केलं आवाहन 


आष्टी :  तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून येत आहे त्यामुळे सर्व नागरिकांनी कोरोना आजार न होण्यासाठी जागृत राहण्याचे आवाहन तहसिलदार राजाभाऊ कदम यांनी आष्टी तहसीलदार पदाचा पदभार गुरूवारी स्वीकारल्यानंतर केले आहे. 

आष्टी तालुक्यात गुरूवार पर्यंत ९३४ पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहेत तर २२ जणांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती आरोग्य विभागाकडून घेऊन तसेच कोवीड सेंटर वर ७४ पॉझिटिव्ह रूग्ण उपचार घेत असून तेथील समस्या बाबत डॉक्टर यांनी पहिल्याच दिवशी तहसिलदार यांना सांगितले. लगेच तहसिलदार यांनी नगरपंचायतीचे प्रभारी मुख्यधिकारी यांना बोलावून घेऊन तेथील समस्या तात्काळ सोडविण्याच्या सूचना देण्यात आल्या. तरी तालुक्यातील नागरिकांनी खोकला, सर्दी, ताप असल्यास पुढे येऊन कोरोना टेस्ट करून घ्यावी तो आजार अंगावर न कारता तात्काळ पुढे येऊन उपचार करावा व आपली व आपल्या कुटुंबाला यांचा धोका होणार नाही याची काळजी घ्यावी तसेच ज्या नागरिकांना बिपी, शुगर असेल त्यांना कोरोनाचा जास्त धोका असून त्यांनी जास्त काळजी घ्यावी.

तालूक्यात कोरोनाचा आकडा वाढतोय. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा, आष्टी तालुक्यात डोर टू डोर आरोग्य विभागाच्या वतीने १५ आॅक्टोबर ते २५ आॅक्टोबर पर्यंत माझे कुटुंब माझी जबाबदारी सर्वे होणार आहे तरी सर्व नागरिकांनी खरी माहिती सांगावी व आरोग्य विभागाच्या नियमांचे तंतोतंत पालन केले तरच कोरोनाचा प्रतिबंध करु शकतो असे आवाहन तहसिलदार राजाभाऊ कदम यांनी केले आहे.


No comments