Breaking News

बीडच्या भुमीपुत्राची केंद्रीय आयुष मंत्रालयाकडून दखल


डॉ.शिवरत्न शेटे केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांच्याकडून आयुषवर नियुक्त

दिंद्रुड :  बीड जिल्यातील दिंद्रुडचे भुमीपुत्र डॉ.शिवरत्न शेटे यांची केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांच्याकडून दिल्ली येथे आयुषवर नियुक्ती करण्यात आली आहे . बीडच्या भुमीपुत्राची केंद्रीय आयुष मंत्रालयाकडून दखल घेण्यात आल्याने आनंद व्यक्त होत आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे माजी प्रमुख ओमप्रकाश शेटे यांचे जेष्ट बंधू असलेले डॉ. शिवरत्न नक्कीच दिल्लीतही बीडचा प्रभाव पाडतील यात शंका नाही .

         

आयुर्वेद शास्त्रातील योगदान आणि त्या ज्ञानाचा देशातील आरोग्यासाठी धोरणात्मक उपयोग व्हावा याकरिता  केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाअंतर्गत नुकतीच संपूर्ण देशातून चार आयुर्वेद तज्ज्ञांना नाम निर्देशित केले त्यात पद्मभूषण डॉ.त्रिवेदी, .डॉ,डोईफोडे, .डॉ,पद्मा श्रीवास्तव आणि डॉ.शिवरत्न शेटे यांचा समावेश आहे. 

आजपर्यंतच्या आयुर्वेद चिकित्सेतील वेगवेगळ्या आजारांवर हजारो रुग्णांवर केलेल्या यशस्वी चिकित्सेच्या अनुभवाचा फायदा आयुर्वेदाची राष्ट्रव्यापी आरोग्य विषयक लोकोपयोगी धोरणं ठरविण्यासाठी निश्चितच उपयोगी होईल . 2017 साली,मा.पंतप्रधान मोदीजी यांनी एम्स च्या धर्तीवर आयुर्वेदाचेही मोठमोठे हॉस्पिटल असावेत,जगातील पहिले वैद्यकीय शास्त्र आयुर्वेद हे जागतिक पातळीवर सिद्ध व्हावे,याकरिता दिल्ली मध्ये भव्यदिव्य ,आयुष मंत्रालय अंतर्गत स्वायत्त अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान उभारले असेच आयुर्वेद हॉस्पिटल गोव्या सहा प्रत्येक राज्यात नियोजित आहेत.

         

आयुर्वेद ही दुष्परिणाम रहित भारतीय चिकित्सा पद्धती असल्याने स्वतंत्र आयुष मंत्रालय आणि स्वतंत्र केंद्रीय मंत्री मा.श्रीपादजी नाईक यांनी अथक मेहनत घेऊन आयुर्वेद शास्त्रास राजाश्रय देऊन न्याय दिला आहे. आयुर्वेद शास्त्राची सेवा 

देशाची राजधानी दिल्लीत करण्याची संधी या आयुष नियुक्ती मुळे प्राप्त झाली आहे .सर्वांना अभिमान वाटेल अशीच सार्थ कामगिरी करणार असे डॉ शिवरत्न शेटे यांनी सांगितले. किल्लेभ्रमंती आणि छत्रपती शिवरायांचा इतिहास आपल्या व्याख्यानाद्वारे गडचिरोली पासून गडहिंग्लज पर्यंत आपल्या ओजस्वी वक्तृत्वाने गाजविणाऱ्या आणि हिंदवी परिवाराच्या गड भ्रमंती मोहिमांच्या माध्यमातून आजवर लाखों आचरणकर्ते शिवभक्त घडवून राष्ट्रबांधणी करणाऱ्या डॉ शेटे यांची केंद्रीय पातळीवर दखल घेतल्याने त्यांचे सार्वत्रिक अभिनंदन होत आहे. 


No comments