Breaking News

कृषी सहाय्यक चौधरी यांची बदली करा अन्यथा उपोषण करू लोणी ग्रामस्थांचा प्रशासनला इशारा

के. के. निकाळजे । आष्टी

तालुक्यातील लोणी सय्यदमीर येथे कार्यरत असलेल्या कृषी सहाय्यीका शारदा चौधरी यांची तात्काळ बदली करून कर्तव्यदक्ष कृषी सहाय्यक नेमणूक करावी अन्यथा कृषी कार्यालयासमोर उपोषणाला बसू असा इशारा समस्त लोणी ग्रामस्थांनी लेखी निवेदनाद्वारे कृषी अधिकारी यांना दिला आहे.

           

निवेदनात म्हटले आहे की, लोणी सय्यदमीर या गावासाठी शारदा चौधरी या कृषी सहाय्यीका नेमलेल्या असून त्यांचे कार्य निष्काळजी पणाचे आहे. गावकऱ्यांना कोणत्याही योजनेची माहिती न देणे, सतत गैरहजर राहणे यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.  अहमदनगर येथून कारभार चालवणाऱ्या चौधरी यांना गावातील एखाद्या शेतकऱ्याने काही अडचण विचारण्यासाठी फोन केला तर अरेरावी करून उद्धट वागणूक दिली जाते.  चौधरी यांना आठवड्यातील मंगळवार व गुरुवार हे दोन दिवस कामाचे ठरवून दिलेले असताना देखील एकही दिवस त्या हजर राहत नाहीत. याबाबत त्यांना कोणी विचारले असता मी महिला आहे मी काहीपण करु शकते असे उत्तरे देऊन मोकळे होतात.  

           जबाबदार अधिकारी जर अशा पध्दतीने वागत असेल तर सर्वसामान्य शेतकऱ्यांनी कोणाकडे न्याय मागावा असा भावनिक प्रश्न समस्त ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. सय्यदमीर लोणी गावासाठी लवकरात लवकर एक कर्तव्यदक्ष कृषी सहाय्यकाची नेमणूक करवी अन्यथा सर्व ग्रामस्थ कृषी कार्यालया समोर उपोषणाला बसू असा इशारा ही निवेदनात देण्यात आलेला आहे.No comments