Breaking News

हरिसुख प्रतिष्ठानच्या वतीने तलाठी अमोल सवईशाम यांना कोरोना योध्दा म्हणून सन्मान

परळी : येथील तलाठी संघटनेचे सचिव तसेच सारडगाव, नंदनज, सावरगावच्या सज्जाचे तलाठी अमोल सवईशाम यांना हरिसुख प्रतिष्ठानच्या वतीने कोरोनाच्या संकटात उत्कृष्टपणे सेवा बजावल्याबद्दल कोरोना योध्दा म्हणून गौरव करून सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे. 

           

आजच्या या भीषण (कोविड १९) परिस्थितीत स्वतःच्या जीवाची पर्वा न करता गोर गरिब जनतेसाठी आपण अहोरात्र धडपडत आहात. आपल्या शासकीय सेवेतील कार्याची दखल घेउन हरिसुख प्रतिष्ठानच्या वतीने तलाठी अमोल सवईशाम यांना कोविड योध्दा पुरस्कार २०२० या सन्मानाने गौरवण्यात येत आहे. तुम्ही समाजासाठी दिलेले योगदान अतिशय कौतुकास्पद आहे. आपल्या पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा! असे सन्मान पत्रात नमूद केले आहे.  

       

जगासह संपूर्ण देशात कोरोनाने आहाकार घातला आहे. अशा कठीण परिस्थितीत कोरोनाच्या संकटात जिवाची पर्वा न करता आपले योगदान दिले आहे. कर्तव्य बजावणाऱ्या ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक, आशा कर्मचारी, पोलीस अधिकारी व कर्मचारी, पत्रकार बांधवांचा आणि सामाजिक कार्यकर्ते यांचा गौरव करण्यात आला. यामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समाजासाठी व आरोग्यासाठी नागरिकांच्या. सुरक्षेसाठी आहोरात्र केलेल्या कार्य करणाऱ्या तलाठी अमोल सवईशाम यांचा गौरव करण्यात आला आहे.   बीड जिल्हा परिषद जल व्यवस्थापन व स्वच्छता समिती सदस्य, हरिसुख प्रतिष्ठानचे अध्यक्ष,   भाजपा  युवानेते राजेश हरिश्चंद्र गित्ते यांच्या पुढाकाराने तलाठी अमोल सवईशाम यांचा गौरव करण्यात आला. सन्मानपत्र देतांना  पत्रकार धिरज जंगले, तलाठी पंडीत, सोमनाथ गित्ते, प्रशांत तिडके यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आले.

 

कोरोना संक्रमण काळात तलाठी अमोल सवईशाम यांनी कोरोना योध्दा म्हणून ग्रामीण भागात सामाजिक जबाबदारी उत्कृष्टपणे चांगल्या प्रकारे पार पाडली आहे. कोरोना संदर्भात जनजागृती असेल टाळेबंदी, कंटनमेन्ट झोनमधील व गावात कोरोनाचा शिरकाव होऊ नये यासाठी त्यांना आपल्या उपाय योजना केल्या. मुंबई, पुणे औरंगाबाद येथून आलेल्या नागरिकांना कोरंटाईन करणे, वेळोवेळी शासनाच्या आदेशाचे नागरिकंपर्यंत जाऊन जनजागृती करणे हे करत असतांना त्यांची स्वतःची टेस्ट पाँझिट्व्ह आली व त्यावर मात करून आणखी जोमाने कामाला लागले आहेत. त्यांच्या या सर्व कामांची दखल घेऊन हरिसुख प्रतिष्ठानच्या वतीने तलाठी अमोल सवईशाम यांचा कोरोना योध्दा म्हणून गौरव करून सन्मानपत्र देण्यात आले. तलाठी अमोल सवईशाम यांना कोरोना योध्दा सन्मान मिळाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.


No comments