Breaking News

खा. प्रीतम मुंडेंकडून हंगे कुटुंबियांचे सांत्वनगौतम बचुटे ।  केज 

तालुक्यातील हदगाव येथील झुंबर उर्फ केशव शिवाजी हंगे या तरुण शेतकऱ्याचा अंगावर वीज पडून १० ऑक्टोबर रोजी मृत्यू झाला होता. बीड जिल्ह्याच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी बुधवारी ( ता. १४ ) रात्री गावात जाऊन हंगे कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केले. 

        परतीच्या पावसाने केज तालुक्यात खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असताना १० ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह झालेल्या पावसात वीज अंगावर पडल्याने हदगाव येथील झुंबर उर्फ केशव शिवाजी हंगे या तरुण शेतकऱ्याचा बळी गेला होता. या घटनेनंतर बुधवारी रात्री खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी हदगाव या गावी भेट देऊन हंगे कुटुंबियांची भेट घेतली. सांत्वन करून हंगे कुटुंबाला धीर दिला. तर शासनाकडून मिळणारी चार लाख रुपयांचा मदत लवकरात लवकर कुटुंबास देण्याच्या सूचना ही त्यांनी प्रशासनास दिल्या. 

          यावेळी जेष्ठ नेेते नंदकिशोर मुंदडा, युुवा नेते तथा सभापतीपती विष्णु घुले, विजयकांत मुंडे, रमाकांत मुंडे, डॉ. वासुदेव नेरकर, सुरेंद्र तपसे, तालुकाध्यक्ष भगवान केदार, नायब तहसीलदार सचिन देशपांडे, हदगावचे सरपंच सुनील वायबसे, सरपंच बंडू भांगे बापूराव घाडगे, बालासाहेब चंदनशिव, संभाजी गायकवाड, पांडुरंग भांगे, धीरज वनवे, बप्पा डोंगरे, बंडू गदळे, गणेश वायबसे, माजी सैनिक वायबसे हे उपस्थित होते.


No comments