Breaking News

'मनिषा' सामूहिक बलात्कार व हत्याकांडातील आरोपींना फाशी द्या व उत्तरप्रदेश सरकार बरखास्त करा


परळीतील विविध संघटनांच्या वतीनं राष्ट्रपतींना निवेदन 

  z

परळी  : हाथरस येथील मनिषा वाल्मिकी सामूहिक बलात्कार व हत्याकांडातील आरोपींना तात्काळ फाशी द्या व उत्तरप्रदेशातील योगी सरकार बरखास्त करा असे राष्ट्रपतींच्या नावे परळीच्या तहसीलदार मार्फत निवेदन दि.०१/१०/२०२० रोजी तहसील कार्यालयात देण्यात आले. यावेळी अनंत इंगळे, अ‍ॅड.कपिल चिंडालिया, इंजि.भगवान साकसमुद्रे, अ‍ॅड.आर.डी.उजगरे, केशव गायकवाड, रवी मुळे, राकेश वाल्मिकी, विक्रम चिंडालिया, प्रशांत कदम, विजय क्षीरसागर, अमर रोडे, सनी कसबे, ओमप्रकाश शिंदे, आकाश सावंत, आकाश देवरे सह परळीतील विविध सामाजिक संघटनेचे प्रमुख पदाधिकारी याठिकाणी उपस्थित राहून निवेदनावर स्वाक्षरी केल्या आहेत.  

दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात अनुसूचित जाती-जनजाती व इतर मागास्वर्गीयांवर भेदभाव करून जातीवाद, हत्या, बलात्कार इत्यादी गुन्हे सर्रासपणे होत असल्याने तेथे प्रचंड अराजकता निर्माण झाली असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. हाथरस, उत्तर प्रदेश येथे दि.१४/०९/२०२० रोजी अमानवीय पद्धतीने घडलेल्या, कंबर मोडून, मान मोडून, जीभ कापून केलेल्या सामूहिक बलात्कार व हत्याकांडातील पीडिता मनीषा वाल्मिकी व कुटुंबियांना न्याय मिळण्यासाठी या निवेदनाद्वारे मागणी केली आहे व चेतावणीही दिली आहे  की, भाजप शासित उत्तरप्रदेशात प्रशासकीय अधिकारी संवैधानिक मूल्यांचं पालन न करत असल्याने तेथे तात्काळ राष्ट्रपती राजवट लागू करावी व पीडित मनीषा वाल्मिकी व कुटुंबास फास्ट ट्रॅक कोर्ट नेमून त्या चार उच्चवर्णीय ठाकूर आरोपींना तात्काळ फासावर लटकवण्यात यावे तसेच संबंधित जिल्हाधिकारी व पोलीस प्रशासनाने मनीषाच्या कुटुंबीयांची परवानगी न घेता अंतिम विधी जबरजस्तीने अर्ध्या रात्रीच उरकून घेतला त्यामुळे पुरावा नष्ट करण्याचं षडयंत्र करणाऱ्या त्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करून या गुन्ह्यात सह आरोपी करावे. सदरील अमानवीय घटने संबंधी ऍट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा नोंद केलेला नाही तसेच भविष्यात जाती बघून भेदभाव करणाऱ्या शासनाचा व गोदी मीडियाचा निवेदन कर्त्यांनी या जातीय मानसिकतेतून भेदभाव पूर्वक वागणूक देणाऱ्या व्यवस्थेचा धिक्कार करून जाहीर निषेध केला आहे.


No comments