Breaking News

बीड शहरातील रखडलेली कामे आ.संदिप भैय्यांच्या माध्यमातून गुणवत्तापुर्णच करून घेवू

 

नगरसेवक चव्हाण, चौहाण, पोपळे, मोरे, बनसोडे, मामु, घाडगे, तांदळे यांचे पत्रक
बीड : नगर नगर पालिकेने शहरातील अनेक कामे वर्षानुवर्षे रखडवली असून तर काही कामे अर्धवट अवस्थेत सोडलेले आहेत. यासंदर्भात आ.संदिप भैय्या क्षीरसागर सातत्याने पाठपुरावा करत आहेत. मध्यंतरी पावसाळ्यामुळे आम्ही गप्प होतोे मात्र आता शहरातील रखडलेली सर्व कामे आमदार संदिप क्षीरसागर यांच्या माध्यमातून गुणवत्तापुर्णच सुभाष रोडच्या धर्तीवर करून घेवू असे पत्रक नगरसेवक रमेश चव्हाण, सम्राट चौहाण, प्रभाकर पोपळे, भैय्या मोरे, रणजीत बनसोडे, मामू गुत्तेदार, विशाल घाडगे, गणेश तांदळे यांनी काढले आहे.

नगरसेवकांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, बीड शहरातील विविध योजनामधील विकास कामे बीड नगर पालिकेने आणि नगराध्यक्षांनी जाणीवपुर्वक अनेक वर्षांपासून रखडवली आहेत. बीड शहरात काही ठिकाणी रस्ते अर्धवट खोदून ठेवले आहेत. याचा शहरातील नागरिकांना नाहक त्रास होत असून सदरील सर्व रस्त्याची कामे पुर्ण करण्यासाठी या संदर्भात आ.संदिप भैय्या क्षीरसागर सातत्याने पाठपुरावा करत आहेत. सहा महिन्यापुर्वी या संबंधात आ.संदिप भैय्यांनी मुख्याधिकारी नगर परिषद बीड यांना दि.3.3.2020 रोजी पत्र देवून बीड नगर पालिकेतील प्रलंबित व नव्याने करावयाच्या विकास कामांची माहिती मागवली. 

यासाठी आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबतही पत्र व्यवहार केला. या पाठपुराव्यानंतर जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी या संदर्भात बैठक घेतली आणि मुख्याधिकारी नगर परिषद बीड यांना उद्देशून दि.28.9.2020 रोजी सर्व कामांची माहिती देवून ज्या कामाचे अंदाजपत्रके, वर्क ऑर्डर व सर्व कागदपत्रे व्यवस्थित आहेत असे कामे सुरू करण्याच्या सूचना दिल्या. मात्र नगर पालिकेतील मुख्याधिकारी, अधिकार्‍यांनी विकास कामांची माहिती द्यायला देखिल टाळाटाळ केली. यामुळे आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी या संदर्भात मुख्याधिकार्‍यांच्या विरोधात स्वतंत्र हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. भर पावसाळ्यात कामे केल्यास त्याचा दर्जा ढासळतो. कामाची गुणवत्ता टिकत नाही असे माहिती असतांनाही पालिका जाणीवपूर्वक पावसाळ्यातच काम करू लागली होती. याबाबत आम्ही इस्टीमेट, वर्क ऑर्डर मागवून नियमाप्रमाणे काम झाले पाहिजे अशी मागणी करत होतोत. नाल्याचे उतार व्यवस्थित निघले पाहिजेत, अगोदर नाली मग रस्ता अशी रास्त मागणी करत असतांना पालिका कोणतेच रेकॉर्ड दाखवत नाही. असे असतांना 2012 मधील सुभाष रोड, जिल्हा रूग्णालय, बशीरगंज सारखा रस्ता आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या पाठबळामुळे आणि दबावामुळे झालेला आहे. सुभाष रोडची क्वॉलीटी आणि गुणवत्ता शहरातील जनतेने बघितलेलीच आहे. त्यामुळे शहरातील अर्धवट अवस्थेतील सर्व कामे गुणवत्तापुर्णच आ.संदिप भैय्यांच्या माध्यमातून करून घेवूत. 

आ.संदिप भैय्य्या क्षीरसागर यांच्या पाठपुराव्यातून बीड शहरात विविध योजनामधून विकास कामे मंजूर आहेत. पावसाळ्यात कामे करण्याचा काही गुत्त्तेदारांचा डाव होता. मात्र त्यामुळे कामांचा दर्जा टिकला नसता. आता पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे बीड शहरात जी काही रखडलेली कामे आहेत ती सर्व कामे आ.संदिप भैय्या क्षीरसागरांच्या माध्यमातून प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत गुणवत्ता पुर्णच करून घेवू. यापुर्वी देखिल प्रशासनाने आ.संदिप भैय्यांच्या पत्रानंतरच रखडलेली विकास कामे वेळेत पुर्ण करण्याचे निर्देश नगर पालिकेला दिले होते. आता आम्ही सर्व नगरसेवक गुणवत्तापुर्ण रस्ता नाल्यांचे व इतर विकास कामासाठी रस्त्यावर उतरून कामे करून घेवू असेही पत्रकात नगरसेवक रमेश चव्हाण, सम्राट चौहाण, प्रभाकर पोपळे, भैय्या मोरे, रणजीत बनसोडे, मामू गुत्तेदार, विशाल घाडगे, गणेश तांदळे यांनी म्हटले आहे.

अधिकार्‍यांवर कारवाई होणार

बीड नगर पालिकेत नगराध्यक्षांच्या दबावाखाली येवून निविदा प्रक्रियेत अधिकार्‍यांना अनियमितता केल्या आहेत. आयुक्तांनी गठीत केलेल्या चौकशी समितीत या अनियमितता समोर आल्या आहेत. या प्रकरणात नगराध्यक्षांविरूद्ध कारवाईचा प्रस्ताव मागविण्यात आला असून अधिकार्‍यांविरूद्ध विभागीय चौकशी अंतर्गत दोषारोपपत्र मागविण्यात आले आहेत. त्यामुळे या प्रकरणात अधिकार्‍यांवर कारवाई अटळ आहे. आता तरी विद्यमान अधिकार्‍यांनी नगराध्यक्षांच्या दबावाखाली मनमानी करू नये अन्यथा त्यांनाही कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशाराही नगरसेवकांनी दिला आहे. 

No comments