Breaking News

महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यास सरसकट भरीव मदत केल्यामुळे आनंद उत्सव - रमेश सोळंकेमाजलगाव :  महाराष्ट्र शासनाच्या वतीने संकटग्रस्त शेतकर्यास अतिवृष्टी, महापुरामुळे विविध खरीप पिकांची नुकसान झाल्यामुळे तातडीने मा.मुख्यमंत्री, मा.उपमुख्यमंत्री, मा. महसूल मंत्री यांनी दौरा करून शेतकर्यांची व्यथा पाहुन तातडीने कॅबिनेट बैठक बोलावून जो निर्णय घेतला व शेतकर्यास दिवाळी पुर्वी आर्थिक भरीव मदत जाहिर केल्याबद्दल माजलगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे राष्ट्रवादी व शिवसेना कार्यकत्यांनी फटाके वाजवून आनंद उत्सव साजरा केला.

     

या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मनोहर डाके, नासेरखाॅ पठाण यांनी मा.उध्दवजी ठाकरे साहेब व उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार साहेब, काँग्रेस बाळासाहेब थोरात महसूल मंत्री यांचे अभिनंदन केले व संकटग्रस्त शेतकर्यास दिवाळी च्या काळात या नेत्यांनी कॅबिनेट बैठक घेवुन तातडीने निर्णय घेतल्याबद्दल शासनाचे आभार मानुन शेतकर्यांची जान असणारे सरकारचे अभिनंदन केले.

     या प्रसंगी रा.काँ.पार्टीचे विधानसभा अध्यक्ष विश्वाभर थावरे, ता.अ.रमेश सोळंके,भिमकराव हाडुळे,खुर्शिद नाईक, कचरू खळगे, कृ.उ.बा.स.सभापती संभाजी शेजुळ,जि.प.समाज कल्याण सभापती कल्याण आबुज, जि.प.स.चंद्रकांत शेजुळ,पं.स.सभापती भागवत खुळे,पं.स.सदस्य जयदत्त नरवडे, मिलिंद लगाडे, भगवान कदम, पिंन्टु रूद्रवार,न.प.स.शेख मंजुर, भागवत भोसले, राहुल लंगडे, शिवसेनेचे अशोक आळणे, अमोल डाके, अनंतराव सोळंके, सय्यद लतीफ व इत्यादी कार्यकर्ते उपस्थित राहुन घोषणा देऊन आनंद उत्सव साजरा केला.

No comments