Breaking News

एन. के. अप्पा सरवदे यांना परळीत सर्वपक्षीय श्रध्दांजली


परळी : 
वंचित बहुजन आघाडीचे नेते तथा ॲड.प्रकाश आंबेडकर यांचे एकनिष्ठ कार्यकर्ते एन.के.अप्पा सरवदे यांना परळीत सर्वपक्षीय श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. एन.के.अप्पा सरवदे यांचे ०७ ऑक्टोबर रोजी निधन झाले होते. गेल्या अनेक वर्षांपासून ते आंबेडकरी चळवळीची धुरा आपल्या खांद्यावर घेवून कार्यरत होते. परळीच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात त्यांचे काम अतिशय उल्लेखनिय असे आहे.

आंबेडकरी चळवळीचे खंदे समर्थक तथा वंचित बहुजन आघाडीचे जेष्ठ नेते एन.के.अप्पा सरवदे यांचे नुकतेच निधन झाले. या पार्श्वभूमीवर गुरूवारी परळीतील नटराज रंगमंदीर येथे श्रध्दांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. सर्वपक्षीय कार्यक्रमात अनेकांनी एन.के.अप्पांच्या जीवनपरिचयाला उजाळा दिला. गेल्या दोन दशकांपासून एन.के.अप्पा परळीच्या सामाजिक तथा राजकीय चळवळीत सक्रीय होते. भूमीहिनांसाठी त्यांनी गायरानाचा मुद्दा अनेक वर्षे चालवला, शासन दरबारी प्रशाकीय पाठपुरावा करून त्यांनी गोरगरीबांसाठी संघर्षही उभा केला होता. गुरूवारी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भास्करनाना रोडे होते. या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, प्रा.दासू वाघमारे, विश्वनाथ गायकवाड, माधव ताटे, गंगाधरअप्पा रोडे, प्रा.अतुल दुबे, श्रीकांत पाथरकर, दिलीप जोशी, प्रा.विलास रोडे, दत्ताभाऊ सावंत, सुभाष सावंत, गौतम आगळे, शेख शरिफ, शेख अल्ताफ यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मिलींद घाडगे यांनी तर सुत्रसंचलन प्रा.वसंत कांबळे यांनी केले. या कार्यक्रमास मनोहर कांबळे, डी. एल. गायकवाड, वैजनाथ कळसकर, प्रसेनजित रोडे, फुलचंद गायकवाड, केशव कांबळे, साहेबराव रोडे, गफारशहा खान आदी उपस्थित होते.


No comments