Breaking News

ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते शनिवारी होणार वाण धरणाचे जलपुजनपरळी : 
परळी शहरासह तालुक्यातील 14 गावांना पिण्याचे पाणी पुरवणाऱ्या नागापूर येथील वान धरणाचे जलपूजन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना धनंजय मुंडे यांच्या हस्ते जलपूजन कार्यक्रम शनिवार दि.10 ऑक्टोबर 2020 रोजी होणार असल्याची माहिती माजलगाव पाटबंधारे विभाग, परळीचे कार्यकारी अभियंता आर.ए.सलगरकर यांनी दिली.

गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ, औरंगाबाद अंतर्गत असलेल्या परळी येथील वाण प्रकल्प, नागापूर येथे शनिवार दि. १० ऑक्टोबर रोजी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते जलपूजन करण्यात येणार आहे. परळी शहराला पाणी पुरवठा करणारे नागापुर येथील वाण धरण २३ सप्टेंबर रोजी पुर्ण क्षमतेने भरले आहे. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जि.प.अध्यक्षा सौ. शिवकन्याताई सिरसाट, जि.प.सदस्य अजय मुंडे, प्रा.मधुकर आढाव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. वाण प्रकल्पावर सकाळी ९ वा. विधीवत जलपूजन कार्यक्रम होणार आहे.


No comments