Breaking News

डाकेपिंप्रीत ७० आकडे बहाद्दरांवर महावितरणच्या पथकाची कारवाईबाळासाहेब आडागळे । माजलगाव  तालुक्यातील वाढत्या विजचोरीला आळा घालण्यासाठी विज वितरण कंपनीच्या वतिने धडक करवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला असुन माजलगाव तालुक्यातील डाकेपिंप्री येथे आकडे टाकुण विज चोरी करणार्या ७० आकडे बहद्दरावर दि ३० आँक्टो शुक्रवार रोजी कारवाई करण्यात आली आहे.

 माजलगाव तालुक्यातील ग्रामीण भागात आकडे टाकुण विज चोरी खुलेआम सुरु असुन याकडे आता महावितरण कंपनीने वेगवेगळ्या पथकाची नेमणूक करुन आकडे टाकुण विज चोरी करणार्या आकडे बहद्दरावर कारवाई निर्णय घेतला असुन माजलगाव तालुक्यातील डाकेपिंप्री येथे दि ३० आँक्टो शुक्रवार रोजी विज वितरण कंपनीच्या पथकाने आकडे टाकुण खुलेपणाने विजचोरी करणार्या ७० आकडे बहद्दरावर कारवाई करत त्यांच्याकडुन विजचोरी करण्यासाठी वापरण्यात आलेले वायर जप्त करण्यात आले आहे, विजवितरण.कंपनीच्या पथकात कनिष्ठ अभियंता गुंदेवार यांच्या मार्गदर्शनाखाली  विजवितरण कंपनीचे लाईनमन बाळासाहेब दराडे,महेंद्र भाग्यवंत, गोविंद झेटे,चंद्रकांत मोरे,वसंत भालेराव, गजानन मुंडे,निलेश थावरे,सुरेश भारती,महादेव काळे व आमोल नाईकनवरे यांनी कारवाई केली आहे.


No comments