Breaking News

आडसमध्ये तरुणाची आत्महत्त्या


केज :
तालुक्यातील आडस येथील राघू उत्तम काळे वय २२ वर्ष या तरुणाने ७ ऑक्टोबर रोजी बुधवारी रात्री ११:३० वा. च्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केली. 

याबाबतची माहिती अशी की  उत्तम काळे  वय २२ वर्ष अंबाजोगाई येथे  एका खाजगी गुत्तेदाराकडे केबल जोडणीचे काम करीत होता. परंतु लॉक डाऊनमध्ये  काम बंद असल्यामुळे तो आडस या गावीच रहात होता. त्याच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. हाताला काम नसल्याने त्याला गावी येण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. गावी येऊन तीन - चार महिन्याचा कालावधी झाला होता. राघू काळे याने दि.७ ऑक्टोबर रोजी बुधवारी रात्री उशीरा ११:३० वा. च्या सुमारास आडस येथील बाजार समितीच्या उपबाजारपेठेत सुरु असलेल्या बांधकामावर त्याने स्वत : च्या शर्टाने गळफास लावून आत्महत्या केली. घरच्या लोकांनी शोध घेतला असता त्याने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले . घटनेची माहिती त्याचे चुलते यांनी धारूर पोलीस स्टेशन अंतर्गत दूरस्थ पोलीस चौकी आडस येथे दिली आहे. त्यानुसार फौजदारी प्रक्रिया संहिता १७४ प्रमाणे आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राघू काळे याच्या आत्महत्येचे कारण स्पस्ट झाले नसले तरी लॉकडाउन काळात त्याच्या हातचे काम गेल्यामुळे तो आर्थिक अडचणीत होता. अशी चर्चा सुरू आहे.या आकस्मिक मृत्यू प्रकरणी पोलीस जमादार अनंत अडागळे हे करीत आहेत.No comments