Breaking News

एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलल्याबद्दल मुख्यमंत्री व उपमुख्य मंत्र्यांचे आमदार मेटे यांनी मानले आभार


याप्रमाणेच समाजाचे इतर प्रश्न मुख्यमंत्र्यांनी तातडीने सोडवावेत

मुंबई  :  राज्य लोकसेवा आयोगाची रविवारी (ता. 11 ऑक्‍टोबर) होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल सायंकाळी जाहीर केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला तात्पुरती स्थगिती दिल्यानंतर राज्यातील मराठा समाजात असंतोषाचे वातावरण होते. विशेषतः समाजातील तरुण आक्रमक झाले होते. त्यातच गेल्या काही दिवसांपासून शिवसंग्रामसह मराठा संघटना आणि लोकप्रतिनिधींकडून एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी आक्रमकपणे केली जात होती. या मागणीला यश आले असून शिवसंग्राम संस्थापक अध्यक्ष  आ विनायक मेटे यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. यावेळी त्यांनी परीक्षा पुढे ढकलल्याबद्दल मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री महोदयांचे आभार व्यक्त केले आहेत.
   

महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी, शिवसंग्राम, विविध संघटनानी कोविड व मराठा आरक्षण स्थगितीच्या अनुषंगाने अनेक विद्यार्थ्यांचे भवित्यव्य व आरोग्य टांगणीला लागेलेले होत, अशा परिस्थितीत हि परीक्षा घेणे योग्य होणार नाही, आणि त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होतील त्यामुळे हि परीक्षा पुढे ढकलण्यात यावी असा आग्रह आम्ही मा. मुख्यमंत्र्यांकडे काल २ तास धरला होता, यापूर्वीही वेळोवेळी मागणी केली होती, याबद्दल अनेकांशी मुख्यमंत्री यांनी चर्चा करून परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केला. याबद्दल मी विद्यार्थी, शिवसंग्राम व मराठा संघटना, समाजाच्या वतीने मुख्यमंत्र्यांचे आभार व्यक्त करतो असे आ विनायक मेटे यांनी म्हंटले आहे. अशाचप्रकारे मराठा समाजाचे इतर सर्व प्रश्न देखील मुख्यमंत्र्यांनी सोडवावेत अशी विनंती आ विनायक मेटे यांनी केली आहे.शिवसंग्रामभवन मध्ये आनंदोत्सवबीड येथील शिवसंग्राम भवन येथे स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून या निर्णयाचे आनंदोत्सव साजरा करत करण्यात आले. यावेळी शिवसंग्राम भवन येथे पेढे वाटण्यात आले व आतिषबाजी करण्यात आली. यावेळी शिवसंग्राम युवक जिल्हाध्यक्ष रामहरी मेटे, माजी तालुकाध्यक्ष सचिन कोटूळे, आनंद जाधव, सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे, शहर उपाध्यक्ष शेषेराव तांबे, विद्यार्थी जिल्हा उपाध्यक्ष अक्षय माने, सरचिटणीस प्रशांत डोरले, सामाजिक न्याय सरचिटणीस सुनील धायजे, विद्यार्थी आघाडी शहराध्यक्ष सौरभ तांबे, अनिकेत देशपांडे,  हरीश शिंदे, संकेत गुजर, माही हुंबे आदींसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


No comments