Breaking News

आष्टीच्या बी फार्मसी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची राष्ट्रीय औषध शिक्षण व संशोधन संस्थेत निवड

के. के. निकाळजे । आष्टी आष्टी येथील आनंद चॅरिटेबल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. आ. भीमरावजी धोंडे साहेब यांच्या प्रयत्नातुन आष्टी व परिसरातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना फार्मसी (औषध निर्माण शास्त्र) क्षेत्रांमध्ये शिक्षण घेण्यासाठी 2006 साली फार्मसी काॅलेजची आष्टी येथे  सुरूवात केली. त्यामध्ये आष्टी व कडा येथील डी फार्मसी काॅलेज तसेच आष्टी येथील काॅलेज आॅफ फार्मसुटीकल सायन्स अॅन्ड रिसर्च आष्टी (बी फार्मसी) या पदवी फार्मसी काॅलेजची 2016 साली स्थापना केली. 

याच बी फार्मसी काॅलेज मधील नुकत्याच राष्ट्रीय औषध शिक्षण व संशोधन संस्था (NIPER)  या परिक्षेचा निकाल लागला असुन या काॅलेज मधील कुमार हनुमंत नारायण चव्हाण या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. ही परिक्षा जे विद्यार्थी पदवीधर फार्मसी योग्यता चाचणी (GPAT) उत्तीर्ण झालेले आहेत अशाच विद्यार्थ्यांना देता येते. NIPER  या विषयी थोडक्यात सांगायचे झाले तर ही एक राष्ट्रीय औषध शिक्षण व संशोधन संस्था आहे. भारतामध्ये अशा फक्त सातच संस्था आहेत या संस्थेमध्ये अॅडमीशन घेण्यासाठी NIPER या संस्था मार्फत फार्मसी योग्यता चाचणी घेतली जाते यात प्रवेश मिळवल्यानंतर विद्यार्थ्यांना दरमाहा 12400/- रूपये शिष्यवृत्ती दिली जाते. तसेच काही दिवसापुर्वी पदवीधर फार्मसी योग्यता चाचणी GPAT  परिक्षेचा निकाल लागला यामध्ये या काॅलेजचे कुमार विनोद राजेंद्र बिरादार, कुमार राजु नवनाथ डहाळे,  कुमार हनुमंत नारायण चव्हाण, कुमारी निताली भाऊराव कावळे या विद्यार्थांनी यश संपादन केले आहे यांनाही M. Pharm ला प्रवेश घेतल्यानंतर दरमाहा 12400/- रूपये शिष्यवृत्ती दिली जाते. यावरून आष्टी बी फार्मसी काॅलेज हे औषध निर्माण शास्त्र या क्षेत्रामध्ये यशस्वी वाटचाल करत आहे. या बद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. आ. भीमरावजी धोंडे साहेब, संचालक अजय (दादा) धोंडे, प्रशासन अधिकारी डाॅ. डी बी राऊत, श्री. शिवदास विधाते, श्री. दत्तात्रय गिलचे, श्री. माऊली बोडखे, श्री. संजय शेंडे  यांनी काॅलेजचे  प्राचार्य डाॅ. सुनिल कोल्हे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.


No comments