Breaking News

शासकीय कापूस खरेदी तात्काळ सुरू करा - भाई अॅड. नारायण गोले पाटील



बाळासाहेब आडागळे । माजलगाव   

ओल्या दुष्काळाने शेतकरी हवालदिल झालेला असताना थोडेफार शिल्लक राहिलेला कापूस शेतकरी कसाबसा वेचून घरी आणत असताना त्यास विक्री करण्यासाठी शासनाची कोणतीही बाजारपेठ उपलब्ध नसल्याने, शेतकरी खासगी व्यापाऱ्यांच्या घशात कष्टाने पिकवलेले पांढरे सोने घालत असून खाजगी व्यापारी शेतकऱ्यांची प्रचंड प्रमाणात लूट करतआहेत , त्यामुळे शासनाने  तात्काळ शासकीय कापूस खरेदी सुरू करावी अन्यथा आंदोलन करण्यातचे निवेदन शेकापचे भाईअॅड. नारायण गोले पाटील यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अधिकारी माजलगाव यांना दिले आहे.

 

बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सर्व पिके अवकाळी पावसाने वाहून गेली असून शेतकरी पूर्णता उद्ध्वस्त झालेला आहे सोयाबीन जागेवरच उगवले, बाजरीला झाडावरच कोंब फुटले, तुर पावसाने उधळून गेली, फुटलेल्या कापूसाच्या जाग्यावरच वाती झाल्या तर बोंडे सोडून गेली आशा परिस्थितीत शेतकरी पूर्णता कोल मोडून पडलेला असताना केंद्रशासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायला तयार नाही, राज्य सरकारने शेतकऱ्याला तुटपुंजी मदत जाहीर केली असली तरी ती शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होण्यासाठी दोन महिने लागणार आहेत, शेतकऱ्याने पिकावर भरलेला पीक विमा मंजूर करायला कंपन्या आणि शासन तयार नाही अशा परिस्थितीत थोडाफार राहिलेला कापूस शेतकरी वेचून आपल्या घरी घेऊन आला असताना त्यास विक्री करण्यासाठी कुठलीही शासकीय बाजारपेठ उपलब्ध नसल्याने खाजगी व्यापारी शेतकऱ्याची प्रचंड  प्रमाणात लुट करत आहेत.

 

शेतकरी कोलमडून गेलेला असताना देखील शासन कापसाची शासकीय खरेदी सुरू करायला तयार नाही ही बाब गंभीर स्वरूपाची असून शासनाने तात्काळ कापसाची खरेदी सुरू करावी अन्यथा शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने जिल्हाभर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा उपविभागीय अधिकारी माजलगाव यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे या निवेदनावर भाई अॅड. नारायण गोले पाटील, अॅड. ठोसर, विठ्ठल जाधव, दत्ता जाधव, नंदकुमार सराफ, शिवाजी रकटे, वैजनाथ कदम, अॅड. बाबासाहेब घोडे, अॅड.अनंत बादाडे, व्यंकटेश खुळे, लहू सोळंके, राहुल सोळंके, राहुल मापाडे, अशोक माळेकर, राम चोरगे, लक्ष्मण लाटे, प्रमोद सोळुंके, सुदाम चव्हाण, सिद्धेश्वर लांडे, सिद्धेश्वर गायकवाड, मुंजा पांचाळ, समाधान पौळ आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.


No comments