Breaking News

महाराष्ट्रावरील कोरोना व अस्मानी संकटे दूर करा - फुलचंद कराडश्री संत भगवान बाबा दुर्गोत्सवाच्या देवीची स्थापना 

परळी :  महाराष्ट्र मागील ७ महिन्यापासून कोरोना आजाराशी लढत असतानाच अवकाळी पावसाने शेत शिवार उध्वस्त केले आहे. सर्व राज्य संकटाशी झुंजत असतानाच रोजच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला असून आई जगदंबे राज्यावरील सर्व संकटे दूर करून सर्व जनतेच्या घरात , शेत शिवारात आनंदाचे  दीप लागून संकटाचा आधार दूर कर अशी प्रार्थना भगवान सेनेचे सरसेनापती फुलचंद कराड यांनी केली. श्री संत भगवान बाबा दुर्गोत्सवाच्या देवीची घट स्थापना आज (दि १७) भगवान सेनेचे सरसेनापती फुलचंद कराड व सौ सुमनताई कराड यांच्या हस्ते करण्यात आली . कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने श्री देवीची स्थापना संपर्क कार्यालयात करण्यात आली . प्रारंभी कराड परिवाराच्या वतीने विधिवत पूजा करण्यात आली.

 यावेळी सोशल डिस्टंसीग ठेवून अनेक भाविक सहभागी झाले होते. मागील १० वर्षांपासून आपण मोठ्या उत्साहात देवीची स्थापना करण्यासोबत ९ दिवस कार्यक्रम करीत असतो. परंतु या वर्षी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून संकटात उत्सव साजरा करता येत नाहीत. एकूणच महाराष्ट्रावर कोरोना सोबतच अवकाळी पावसाचे सुद्धा संकट असून या सर्व संकटातून आम्हाला मुक्त कर, शेतकरी व नागरिकांच्या मनात असलेला संकटाचा अंधार दूर कर अशी प्रार्थना यावेळी भगवान सेनेचे सरसेनापती फुलचंद कराड यांनी केली.
No comments