Breaking News

तीनचाकी सरकारने सर्वसामान्य जनतेचे जगणे मुश्किल केले- देविदास धसआष्टीत भाजपाचे लाक्षणिक उपोषण संपन्न

के. के. निकाळजे । आष्टी

या तीनचाकी सरकारने सर्वसामान्य जनतेचे जीवन जगणे मुश्किल केले असून,याच्या या अजब कारभाराला संपूर्ण जनता वैतागली असल्याचा घणाघात आरोप माजी जिल्हा परिषद सदस्य तथा भाजपाचे जेष्ठ नेते देविदास धस यांनी केला.

             

भाजपाच्यावतीने आज संपूर्ण राज्यात मंदिरासमोर लक्षाणिक उपोषण करण्यात आले.आष्टी येथील शनिमंदिरासमोर सकाळी 11.30 वाजता भाजपाचे उध्दवा दार उघड हे अंदोलन माजी जिल्हा परिषद सदस्य देविदास धस यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.यावेळी आष्टी नगर पंचायतचे गटनेते रंगनाथ धोंडे,भारत मुरकुटे,सभापती शेख शरीफ,सुनिल रेडेकर,मनोज सुरवसे,निलेश होनकसे,अनंत देवा जोशी,बब्बुभाई आतार, प्रविण कदम, बबन कदम, अॅड. अविनाश निंबाळकर यांच्यासह आदि उपस्थित होते. 

पुढे बोलतांना देविदास धस म्हणाले,या सरकाने राज्यातले बार चालु केले पण मंदिर,मज्जिद बंद ठेवले आहे.हे सरकार कायम सर्वसामान्य जनतेचे जीवन जगणे मुश्कील केले आहे.आगोदरच लोकांचे कोरोनाने कंबरडे मोडले असल्याचा आरोपही त्यांनी केला.यावेळी अभिषेक करुन सरकारचा निषेध करण्यात आला.


No comments