Breaking News

बाजेबरोबर विणकाम करण्याची कलाही लोप पावतेय .....

आधुनिक दिवाण, बेडला पसंती; विणकाम करणाऱ्या कारागिरांवर बेरोजगारीची कुऱ्हाड शिरूर कासार : काळानुरूप जश्या चाली- रीती बदलू लागल्या त्याप्रमाणे वापराच्या साधनांमध्ये ही बदल होऊ लागला. आकर्षकपणा मुळे आधुनिक साधनांनी भुरळ घातल्याने सर्वच ठिकाणी त्यांनी आपला जम बसविला. बैठक खोली असो की बेड रूम मध्ये बाज ऐवजी दिवाण, लोखंडी पलंग, सोफा यांनी आपली आपली जागा कायम केलीय. त्यामुळे आता शहरापाठोपाठ गावखेड्यात ही बाज नामशेष होत चालली असून बाज विणकाम करणाऱ्या कारागिरांनी आपली ही कला गुंडाळून ठेवल्याचं मत कारागीर बबन थोरात..... यांनी व्यक्त केली. 

थकवा दूर करण्यासाठी आरामदायी म्हणून हवी- हवी असलेल्या बाजेला खेड्या- पाड्यात खूप महत्व असायचं. यामुळे पूर्वी बाजेला जास्त मागणी असल्याने विणकाम करणाऱ्या कारागिरांना यातून उत्पन्न मिळत असे. परंतू, काळ जसा जसा बदलत जाऊ लागला. तशी बाजेची जागा दिवाण, लोखंडी पलंग, सोफा यांनी घेतली. शहरापाठोपाठ या आकर्षक वस्तूंनी गाव खेड्यातील लोकांना ही भुरळ घातली आहे. 

त्यामुळे गाव खेड्यात बाजेची मागणी घटली असून  बाज  नामशेष होत चालली आहे. बाज विणकाम करणाची कला ही दिवसेंदिवस लोप पावत चालली आहे. परिणामी विणकाम करणाऱ्या कारागीरांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. 

शारीक दृष्ट्या बाजेवर झोपल्याने पाठ दुखीचा कोणताही त्रास जाणवत नाही. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने बाज उत्तम आहे. परंतु हल्ली बाजेला मागणी घटली असून जुने लोकच बाजेला पसंती देतात.त्यामुळं बाजेबरोबर बाज विणण्याची कला ही आता लोप पावत चालली आहे. एक बाज विणन्यासाठी साधारणपणे पाचशे ते आठशे रुपये आकारले जातात. असे विणकाम करणारे कारागीर बबन नानाभाऊ थोरात म्हणाले.

बातमीचा व्हिडीओ पाहण्यासाठी व्हिडीओ वर किल्क करा


No comments