Breaking News

परळीत जेष्ठ नागरिक दिन उत्साहात


माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी 
जेष्ठ नागरीकांनी सहकार्य करावे -राधाकृष्ण साबळे

परळी :  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी परळी शहरच्या वतीने जागतिक जेष्ठ नागरिक दिन निमित्त जेष्टावर शुभेछाचा वर्षाव करून माझे कुटुंब माझी जबाबदारी हे अभियान राष्ट्रवादी काँग्रेस राबवीत असुन परळी शहरात राज्याचे विद्यमान सामाजीक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनखाली होत असलेल्या या अभियानास जेष्ठ नागरीकांनी सहकार्य करावे असे आवाहन आयोजीत कार्याक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलतांना राकाँचे शहर उपाध्यक्ष राधाकृष्ण साबळे यांनी केले.


दरम्यान आयोजीत करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या सुरूवातील जेष्ठ नागरीक वैजनाथ सावजी, मुकुंद जगात कर, प्रभाकर गायकांबळे, दादाराव गायकवाड, श्रावण जगतकर, यांचा शाल पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. शासनाने घालून दिलेल्या नियमाचे पालन करून व आरोग्य चे काळजी घेऊन स्वतःच स्वतःचे डॉक्टर बना व उर्वरित आयुष्य आनंदाने घालवा वे असे मोलाचे विचार प्राध्यापक रघुनंदन खरात यांनी विचार पीठावरून मांडले. राज्याची सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचा आदेशानुसार कोरोनाच्या संकट काळात निराधारांना गरिबांना मोफत आना धन्य, मास्क, शाळा महाविद्यालय,  सरकारी दवाखाना,  बस स्थानक, रेल्वे स्टेशन व धार्मिक स्थळे याठिकाणी सॅनिटायझर मशीन चे वाटप व नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत मोठे सहकारी केले त्याचेच फलित म्हणून बाजीराव धर्माधिकारी यांनी केलेल्या कार्याचं कौतुक करून देशपातळीवर व मान्यवराच्या यादीत बाजीराव (भैय्या)धर्माधिकारी यांना सन्मानित करण्यात आल्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष ईपीएस संघर्ष समितीचे सचिव के.डी.उपाडे यांनी कोरोनापासून स्वत:सह कुटूंबाचा बचाव कसा करायचा याविषयी मार्गदर्शन केले. कार्याध्यक्ष अशोक शेप , यांनी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाच्या महत्व विषद करत आहार-विहार यावर ताबा ठेवण्याचे ज्येष्ठांना आवाहन केले. यावेळी कार्यक्रमास भास्कर शिंदे, प्रभाकर कापसे, विक्रम फड, पंडित. मधाळे, डी. एम. जायभाय, आर.टी. सावंत, मनमत तोडकर, ज्ञानेश्वर शिंदे, फुलचंद आपेट, प्रभाकर साळुंखे, शंकर राऊत यांची उपस्थिती होती. यावेळी मास्क चे वाटप करण्यात आले मास्क लावून व सामाजिक आंतर ठेवून सॅनिटायझर चा वापर करत जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन व बैठक यशस्वी केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रास्ताविक के. डी. उपाडे यांनी तर आभार अरुण जोशी यांनी मानले.

No comments