Breaking News

वडवणीच्या कोविड सेंटरला शॉर्टसर्किटने लागली आगनगरपंचायत अग्निशामक दलाच्या गाडीने विझवली आग.


तहसीलदार यांच्याकडुन घटनास्थळाची पाहणी


जगदीश गोरे । वडवणी

वडवणी शहरातील कस्तुरबा गांधी शाळेत कोवीड केअर सेंटरची स्थापना करण्यात आलेली आहे आज रात्री लाईटच्या शॉर्टसर्किटने कोवीड केअर सेंटर च्या दुसऱ्या मजल्यावरील रूम मध्ये  लाईटच्या बोर्डने पेट घेतल्यानंतर बोर्ड जळून खाक झाला व खाली असलेल्या गादीने पेट घेतला आग दिसताच रूम मधील असलेल्या कोरोणा युद्धाने या घटनेची खाली असलेल्या कोरोणा योद्धा यांना माहिती दिली व तातडीने लाईट बंद करून कोरोणा बाधित तरुण रुग्णांनी पाण्याच्या साह्याने आग विजवण्याचा प्रयत्न केला.

 

तोपर्यंत वडवणी नगरपंचायत ची अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली व दुसऱ्या मजल्यावर बम च्या साह्याने आग विझवण्यात आली. सुदैवाने यामध्ये कोणतीही हानी किंवा जास्त  नुकसान झाले नाही मात्र कोरोना बाधित रुग्णांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे  काही काळासाठी मात्र वडवणी कोवीड केअर सेंटर मध्ये गोंधळ उडाला होता. 

या घटनेची माहिती होताच वडवणी तहसीलदार श्री एस डी सांगळे यांनी घटनास्थळी दाखल होऊन घटनेची पाहणी केली व यावेळी वडवणी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मधुकर घुबडे, डॉ. नाईकनवरे आदी यावेळी उपस्थित होते त्यावेळी तात्काळ महावितरण केंद्राला पाचारण करून दुरुस्तीचे आदेश देण्यात आले आहे.


No comments