Breaking News

मोहकुळ तांडा येथे सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटनदिंद्रुड : माजलगाव तालुक्यातील नित्रुड ग्रामपंचायत अंतर्गत मोहकुळ तांडा येथे सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन  भारतरत्न डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त गोर बंजारा शिक्षण सेवा अभियानाचे मुख्य समन्वयक तथा गोर बंजारा ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष रविकांत राठोड यांच्या हस्ते करण्यात आले.माजलगाव तालुक्यातील तांडावस्तीवरील हे वाचनालय कौतुकाचा विषय बनले आहे. 

येथील भारतीय सैन्य दलात कर्तव्यावर असलेले फौजी निखिल कुमार जाधव व अरविंद जाधव यांच्या संकल्पनेतून तांडावस्तीवरील विद्यार्थी दशेपासुन ते प्रौढांना इतीहास, सामान्य ज्ञान, देशात घडत असलेल्या दररोज च्या घटनांची माहिती व्हावी या उद्देशाने सदर सार्वजनिक वाचनालय सुरु करण्यात आले असल्याची माहिती जाधव यांनी दिली. मोहकुळ तांड्याच्या सार्वभौम विकासासाठी फौजी निखिल जाधव व प्राध्यापक अरविंद जाधव यांचे सदैव अमोघ कार्य आहे. गावाच्या वतीने जाधव बांधवांचा गौरव या कार्यक्रमात करण्यात आला.          

यावेळी सर्व कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उत्तमराव जाधव, प्रमुख पाहुणे म्हणून कमलताई आडे, पोलिस अधिकारी चव्हाण साहेब व तांड्यातील महिला भगिनी, लहान थोर यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात कार्यक्रम संपन्न झाला.


No comments