Breaking News

माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांच्यावरील नोंद केलेला गुन्हा मागे घ्या : माजलगाव भाजपाची मागणी


बाळासाहेब आडागळे । माजलगाव 

माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांनी रितसर परवानगी घेऊन सावरगाव येथे भक्तीगडावर भगवानबाबा यांचे दर्शन घेण्यासाठी गेल्या होत्या. मात्र त्यांच्यावर जाणीवपूर्वक गुन्हा नोंद करण्यात आला. पंकजाताई यांच्यावर दाखल केलेला गुन्हा  मागे घेण्यात यावा, अशी मागणी माजलगाव मतदार संघाचे भाजपा नेते रमेश आडसकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपा कार्यकर्त्यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली. 

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की सावरगाव घाट येथे  रविवारी (दि.25) दसऱ्याच्या निमित्ताने भगवान भक्तिगड येथे लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांनी रितसर परवानगी घेऊन दर्शनासाठी गेल्या होत्या. 

त्यांनी महाराष्ट्रातील सर्व भगवान भक्तना जाहीर व सोशल मीडियावर आव्हान केलं होतं की या वर्षी कोरोना आजाराचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कोणीही गडावर येऊ नये गर्दी करू नये व मेळावा हा ऑनलाइन होईल, असे त्यांनी जाहीर केले होते. तरीही बीड जिल्ह्यातील प्रशासनाने त्यांच्यावर गुन्हा नोंद केला, तो तात्काळ परत घ्यावा. यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने तहसीलदार यांना  निवेदन देण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष अरुण राऊत, भाजपा जिल्हा सचिव बबनराव सोळंके, माजी नगराध्यक्ष डॉ अशोक तिडके, डॉ भगवानराव सरवदे, युवा मोर्चा ता. अध्यक्ष मनोज जगताप, भाजपा शहरअध्यक्ष अँड. सुरेश दळवे, गटनेते विनायक  मामा रत्नपारखी ,नगरसेवक दीपक मेंडके ,नगरसेवक ईश्वर होके, डॉ प्रशांत पाटील, शहर उपाध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, ईश्वर खुरपे ,बबन अण्णा सिरसट ,दत्ता महाजन, अर्जुन पायगन, सुशांत जाधवर, जयपाल भिसे, अनिरुद्ध सोळंके, भगवान सरवदे, कल्याण शेप ,तात्या पांचाळ, रवी कुऱ्हाडे,उमेश जाधव ,सागर खुरपे, सूर्यकांत दराडे, माजलगाव तालुका व शहरातील सर्व भाजपा नेते, नगरसेवक, माजी नगरसेवक, शक्तिप्रमुख, बुथप्रमुख प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.


No comments