Breaking News

रोहयोच्या गैरव्यवहाराचे पाळेमुळे शोधण्यासाठी वीस पथक : ११४ गावांची करणार चौकशीकेज पंचायत समितील कर्मचाऱ्यांची पाचावर धारण  

गौतम बचुटे । केज 

 ११४ गावे २० तपास पथके केज पंचायत समितीच्या आवारात थांबलेला गाड्यांचा ताफा आणि आता पुढे काय होणार याची कुणालाच कल्पना नाही परंतु सारेजण धास्तावलेल्या चेहऱ्याने केज पंचायत समितीच्या आवारात वावरत असल्याचे चित्र दिसत आहे.

 

या बाबतची माहिती अशी की, केज पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी रेकॉर्ड उपलब्ध करुन न देणे यासह इतर बाबींत दोषी आढळल्याने तीन कंत्राटी कर्मचाऱ्यांची कायमस्वरुपी सेवा समाप्ती आणि दोन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. केज पंचायत समितीचे गटविकास यांचीही विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आली  आहे. मागच्या आणि यंदाच्या वर्षी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून विविध कामे हाती घेण्यात आली. यात विशेषत: वृक्ष लागवडीच्या कामांची संख्या अधिक आहे. या कामात गैरव्यवहार झाल्याची तक्रार जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली होती. त्यावरून  मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अजित कुंभार यांनी केज तालुक्यातील ११४ ग्रामपंचायतीच्या चौकशी करण्यासाठी २० पथके नेमली आहेत. प्रत्येक पथकात एक शाखा अभियंता विस्तार अधिकारी, कृषी अधिकारी आणि असा ताफा आहे. त्यांच्या दिमतीला गाड्यांचा ताफा असून पंचायत समितीच्या आवारात लगबग दिसून येत आहे. पंचायत समितीचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी हे प्रत्येकजण धास्तावलेल्या चेहऱ्याने वावरत आहेत. एवढेच नव्हे तर पंचायत समिती कार्यालयात हमखास आढळणारे लोकप्रतिनिधी त्यांचे कार्यकर्ते आणि कमासाठी येणारे अभ्यंगत देखील भीती आणि दबाव व तणावपूर्ण वातावरणात दिसत आहेत.  पथकातील अधिकारी काय चौकशी केली याची गुप्तता पाळली जात आहे. चौकशी अधिकारी सुद्धा धास्तावलेलेच आहेत. असं म्हटले तर वावगे ठरू नये.No comments